पुणे, ता. ८ : प्रादेशिक परिवहन समितीने रिक्षा दरवाढीला मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी जलद व सुलभ व्हावी, यासाठी मीटर प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) पूर्ण होईपर्यंत सुधारित दरांचे छापील कार्ड (तक्ता) आणि मोबाईल ॲपला मान्यता द्यावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. भाडेवाढीनंतरची मीटर प्रमाणीकरण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ, किचकट आणि खर्चिक आहे. दीड लाख रिक्षांची प्रत्यक्ष तपासणी केल्याने प्रशासकीय मनुष्यबळ गुंतून राहते आणि वाहतूक कोंडीही होते. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात जुन्या व किचकट पद्धतींऐवजी ‘जीपीएस’ आणि ‘मीटर ॲप’चा पर्याय शासनाने स्वीकारावा. यामुळे अवघ्या काही मिनिटांत नवे दर लागू करता येतील आणि रिक्षाचालकांना मीटर प्रमाणीकरणासाठी मोजावे लागणारे कोट्यवधी रुपये वाचतील, असेही नितीन पवार यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.