पुणे

रिक्षा मीटर तपासणीसाठी पुण्यात तीन ठिकाणी सुविधा

CD

पुणे, ता. ३ : पुणे शहर व परिसरातील ऑटोरिक्षांच्या मीटर तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन ठिकाणी विशेष केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत. रिक्षाचालकांना त्यांच्या सोयीनुसार या केंद्रांवर जाऊन मीटरची तपासणी करण्याचे आवाहन आरटीओ प्रशासनाने केला आहे. अलंकार पोलिस ठाण्यासमोर-कर्वेनगर, इऑन आयटी पार्कजवळ-खराडी, व दिवे चाचणी मैदान येथे मीटर चाचणी करता येणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात एक सप्टेंबरपासून रिक्षांना नवीन सुधारित भाडेदर लागू करण्यात आले आहेत. या नव्या दरानुसार प्रवाशांना आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये द्यावे लागणार असून, मीटर अद्ययावत करण्यासाठी रिक्षाचालकांना २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंतची मुदत दिली आहे.

असे आहेत सुधारित भाडेदर
- पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये
- दीड किलोमीटरनंतर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये
- प्रवाशांसोबत ६०बाय४० सेंटीमीटर आकाराचे किंवा त्यापेक्षा मोठे सामान असल्यास, प्रत्येक नगासाठी तीन ३ रुपये अतिरिक्त शुल्क असेल

मीटर प्रमाणीकरण आणि टेरिफ कार्डचे नियम
नव्या भाडेदरानुसार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) करणे बंधनकारक आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ असा सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. जोपर्यंत मीटरमध्ये नवीन दर अद्ययावत होत नाहीत, तोपर्यंत चालक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आरटीओने एक ‘तात्पुरते टेरिफ कार्ड’ उपलब्ध करून दिले आहे. या कार्डची वैधता २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंतच असेल. त्यानंतर हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही आणि प्रवाशांकडून केवळ मीटरनुसारच भाडे स्वीकारणे रिक्षाचालकांसाठी सक्तीचे असणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Egg Freezing & Future Fertility: आई-वडिल होण्यासाठी अंडी फ्रीज करण्याचा विचार करताय? आधी ‘या’ ४ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT