rickshaw meter rate Sakal
पुणे

Auto : पुणेकरांच्या खिशाला कात्री; रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अक्षय बडवे

Pune Auto Rickshaw Fair Hike : पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि बारामती मध्ये तीन आसनी रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीतील निर्णयानंतर पहिल्या दीड किलोमीटरसाठी नागरिकांना आता 23 रुपये मोजावे लागणार आहे. त्यापुढे प्रत्येक किलोमीटरसाठी 15 रुपये मोजावे लागणार होते. भाडेवाढीपूर्वी पहिल्या दीड किमीसाठी 21 रुपये मोजावे लागत होते. तर, त्या पुढील प्रत्येक किमीसाठी पूर्वी 14 रुपये मोजावे लागत होते.

नवे दर 1 ऑगस्टपासून लागू होणार असून, ज्या रिक्षा 1 ऑगस्टपासून मीटर पून:प्रमाणीकरण (meter callibaration) करून घेतील त्या रिक्षा चालकांनाच नव्याने भाडेवाढ घेण्याचा अधिकार असणार आहे. विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तसेच खटुआ समितीच्या शिफारशीस अनुसरून सदर बैठकीमध्ये ऑटोरिक्षा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवीन भाडेवाढ 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे.

महानगरपालिका क्षेत्राकरिता (पुणे व पिंपरी चिंचवड) रात्री 12 ते सकळी 5 या कालावधीसाठी 25 टक्के अतिरिक्त भाडेदर अनुज्ञेय राहिल. महापालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागारीता रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीसाठी 40 टक्के अतिरिक्त भाडेवाढ असणार आहे. प्रवाशांसमवेत असणाऱ्या सामानासाठी 60 * 40 सेंमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी 3 रुपये प्रति नग इतके शुक्ल अनुज्ञेय राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT