pune news
pune news sakal
पुणे

Pune : 'माझी वसुंधरा अभियानात' बारामती नगरपालिकेस पारितोषिक तीन कोटींचे मिळाले बक्षीस

मिलिंद संगई, बारामती.

Pune - जागतिक पर्यावरणदिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्यामध्ये बारामती नगरपालिकेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तीन कोटी रुपये, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात नगरपालिकेने जे काम केले त्याचा गौरव शासनाच्या वतीने या निमित्ताने केला गेला.

पंचतत्त्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत 50 हजार ते एक लोकसंख्या असलेल्या गटात बारामती नगरपालिकेस तृतीय क्रमांक प्रदान केला गेला.

मुंबईत झालेल्या समारंभात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रधान सचिव प्रवीण दराडे, स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत मार्टिन यांच्या उपस्थितीत हे मुख्याधिकारी महेश रोकडे, नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड, महिला बालकल्याण विभागप्रमुख आरती पवार, आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे,

अजय लालबिगे, माजिद पठाण, विजय शितोळे, गौरव दुरुगकर, शंतनू बारवकर, संतोष तोडकर, सुनील धुमाळ, विक्रम बालगुडे, रणजित अहिवळे, निखिल शीलवंत, सचिन खोरे, आदित्य बनकर यांनी हा पुरस्कार स्विकारला.

गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येणा-या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान केला गेला.

पर्यावरणसंवर्धनासाठी पृथ्वी, वायु, आकाश, अग्नि, जल या पंचमहाभुतांमध्ये केलेल्या विविध सकारात्मक कामाचे सर्वेक्षण करुन त्यातून हे पारितोषिक प्रदान केले गेले. बारामती नगरपालिकेकडून या कामासाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला गेला.

या कामांची घेतली गेली दखल

• वृक्षारोपण व कच-याचे विलगीकरण

• नदी सुधार प्रकल्प व कालवा सुशोभिकरण

• शाश्वत उर्जेवर दिला गेलेला भर

• सौरउर्जेचा वाढविलेला वापर

• प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल वापरास प्रोत्साहन

• पर्यावरणाची लोक चळवळ करण्याचा प्रयत्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT