Mumbai : महावितरण कंपनी ठेकेदारावर टिटवाळात गोळीबार

जखमी उमेश साळुंखे याच्या छातीत लागली गोळी
ठेकेदार उमेश साळुंखे
ठेकेदार उमेश साळुंखेsakal

डोंबिवली : टिटवाळा येथील सावरकर नगरी परिसरात महावितरण कंपनीच्या ठेकेदारावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. ठेकेदार उमेश साळुंखे हे सायंकाळी घराबाहेर उभे असताना काळ्या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

यात त्यांच्या छातीत गोळी लागली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

महावितरण कंपनीचे ठेकेदार असलेले उमेश साळुंखे हे कल्याण टिटवाळा येथील सरकार नगरीत राहतात.रविवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान ते घराबाहेर उभे असताना त्यांच्यावर अचानक गोळी झाडण्यात आली. हल्लेखोरांनी गोळी झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. उमेश यांकज छातीत गोळी लागल्याने ते खाली कोसळले आणि हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

ठेकेदार उमेश साळुंखे
Mumbai : रेल्वेची डिजिटल सिग्नल यंत्रणा कागदावरच ! अठरा हजारापेक्षा जास्त सिंग्नल...

गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक व घरामधील सदस्य यांनी बाहेर येऊन पाहिले असता उमेश हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. जखमी अवस्थेत असलेल्या उमेशला लगेचच जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी डॉक्टरांनी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

ठेकेदार उमेश साळुंखे
Mumbai Crime : धारावीत मारहाणीत एकाचा मृत्यू, पोलीसांकडून आरोपीला अटकेत

त्यानुसार उमेश यांना मुंबईतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. याप्रकरणी कल्याण तालुका टिटवाळा पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. उमेश यांच्यावर कोणी व का गोळी झाडली याचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलीस तपासात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com