पुणे

Baramati Sugar: बारामतीच्या राजकारणात घडामोडींना वेग, माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षांचा राजीनामा

बाळासाहेब तावरे यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदी साडेतीन वर्ष काम पाहिले, तर जाधव यांना उपाध्यक्षपदावर एक वर्षे काम केल्याचे सांगण्यात आले.

कल्याण पाचंगणे

माळेगाव - माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव यांनी आपल्या पदाचा राजिनामा आज दिल्याची माहिती स्पष्ट झाली. परिणामी बारामती तालुक्यातील राजकिय घडामोंडींना वेग आला असून माळेगाव साखर कारखान्याच्या राजकारणात खांडेपालट करण्यावर शिक्कामोर्तेब झाले.

बाळासाहेब तावरे यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदी साडेतीन वर्ष काम पाहिले, तर जाधव यांना उपाध्यक्षपदावर एक वर्षे काम केल्याचे सांगण्यात आले. `` ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव कारखाना अर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवणे आणि सभासदांना सर्वाधिक पैसे देणे, ही बाब केंद्रस्थानी ठेवून खरेतर मी संचालकांच्या मदतीने आजवर काम केले.  वयोमानानुसार माझी तब्बेत साथ देत नाही.  मी माझ्या वैयक्तीक कारणास्तव राजिनामा देत आहे.

अशी भावना तावरे यांनी आपल्या राजिनाम्यामागे स्पष्ट केली. तसेच उपाध्यक्ष जाधव यांनीही आपला एक वर्षाचा कार्य़काळ संपल्यानंतर राजिनामा देत असल्याचे सांगितले. विशेषतः  या राजकिय घडामोडीला राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनीही दुजोरा दिला. तावरे व जाधव यांचे राजीनामे पक्षाकडे आले असता ते राजीनामे कारखान्याचे कार्य़कारी संचालक अशोकराव पाटील यांच्याकडे सुपुर्द केले, अशी माहिती होळकर यांनी दिली. सदरचे राजीनामे संचालक मंडळापुढे मंजूरीसाठी ठेवले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली.

दरम्यान, मावळते अध्यक्ष बाळासाहेब तावरे म्हणाले,`` ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून सभासदांची साधारणतः  १८ वर्षे टप्पापद्धतीने सेवा करण्याची संधी दिली. हे मी कदापीही विसरू शकत नाही.

त्यांच्यासह आजी-माजी संचालक मंडळाच्या सहकार्य़ामुळे माळेगाव कारखाना राज्यात अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न केला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गतवर्षीच्या उसाला ३४११ रुपये प्रतिटन दर जाहिर करून राज्यात ऊस दराच्या बाबतीत आघाडी घेतली. शेतकऱ्यांचे हित आणि संस्थेची अर्थिक क्षमता मजबूत करण्याकडे माझा कल होता.

`` दुसरीकडे, माळेगाव कारखान्याचे संचालक मंडळामध्ये आता अध्यक्षपदासाठी अॅड. केशवराव जगताप, योगेश जगताप, नितीन सातव, मदनराव देवकाते, सुरेश खलाटे हे संचालक इच्छुक आहेत. असे असले तरी माळेगाव कारखान्याचे सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका वरिल पदाधिकारी निवडीमध्ये महत्वपुर्ण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Oppo New Mobile : ओप्पोचा ब्रँड मोबाईल भारतात लॉन्च! पण Oppo Find X9 5G की OnePlus 15 5G..कोणता आहे बेस्ट? पाहा संपूर्ण Review

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT