School sakal
पुणे

बालेवाडी : सतरा महिन्या नंतर वाजल्या शाळेच्या घंटा

कोरोनामुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा आज सोमवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी : कोरोनामुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा आज सोमवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. बाणेर बालेवाडी येथे महापालिकेच्या तसेच काही खाजगी शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी काही इंग्रजी माध्यमाच्या सीबीएससी शाळांनी मात्र अजूनही ऑनलाईन पद्धतीनेच शाळा सुरू ठेवल्याचे चित्र आहे.

बाणेर येथे महापालिकेची सोपणराव कटके शाळा तसेच बालेवाडी येथील बाबुराव बालवडकर शाळेत फक्त आठवीचे वर्ग दुपारी साडे बारा वाजल्यापासून भरणार आहे.तर बालेवाडी येथील म्हातोबा तुकाराम बालवडकर शाळेमध्ये आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग दुपारी साडे बारा वाजता भरविण्यात येणार असून, अकरावी-बारावी चे वर्ग सकाळी सुरू करण्यात आले.शाळेमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे तीन दिवस दहावी ते बारावी आणि पुढील तीन दिवस अकरावी बारावीचे वर्ग भरवले जाणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक शांताराम पोखरकर यांनी दिली.

तसेच बाणेर येथील विद्यांचल हायस्कूल याठिकाणी आठवी ते दहावीचे वर्ग भरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती पत्रक मागविण्यात आले आहेत.पटसंख्या नेहमीपेक्षा कमी असून सोशल डिस्टंसिंग चे पालन करता यावे यासाठी एक दिवस मुलं आणि एक दिवस मुली अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येत आहे अशी माहिती विद्यांचल हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे यांनी दिली. तसेच या भागातील इतर इंग्लीश मिडीयम च्या सीबीएससी शाळांनी मात्र अजूनही शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

Uttarakhand: युवक आता फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर रोजगारनिर्माते; क्रीडा विद्यापीठापासून स्टार्टअपपर्यंत धामींच्या योजना

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

SCROLL FOR NEXT