पुणे

मलकापूर महामार्गावर निखळली एसटीची चाके

CD

महामार्गावर निखळली एसटीची चाके

पाचवड फाटा येथील घटना; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

मलकापूर, ता. १७ : पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील पाचवड फाटा येथे एसटीची पाठीमागील चाके अचानक निखळली. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, घटनेनंतर महामार्गावरील सातारा-कोल्हापूर लेनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर पाचवड फाटा येथे पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे पुलावरून एकच लेन सुरू असल्याने त्यावरून वाहतूक सुरू आहे. दरम्यान, सकाळी कऱ्हाड आगारातून ईश्वरपूर डेपोची कऱ्हाड- सांगली एसटी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुटली. ही एसटी पाचवड फाटा येथे पुलावरती आल्यानंतर अचानक एसटीची पाठीमागील चाके निखळल्याने एसटी पुलावरच थांबली. त्यामुळे पाठीमागून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, महामार्गावरील एकच लेन सुरू असल्याने सातारा-कोल्हापूर बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा कऱ्हाड बाजूकडे नांदलापूरपर्यंत लागल्या होत्या.
महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जगदाळे, पोलिस कर्मचारी विष्णू मर्ढेकर, आशिष पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ठेकेदार कंपनीच्या ग्रेडर मशिनच्या साहाय्याने महामार्गावर चाके निसटलेली एसटी सुमारे अडीचशे मीटर ढकलून बाजूला केली. त्यानंतर तासाभराने महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. या घटनेमुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
----------------------------
01538, 01539
पाचवड फाटा : येथे महामार्गावर चाके निखळल्यानंतर एसटी बाजूला घेऊन प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी. (राजेंद्र ननावरे : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Ticket Price : एसटी प्रवास महागणार? मे महिन्यानंतर खिशाला कात्री बसण्याची शक्यता; काय आहे कारण?

MS Dhoni आज 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून खेळणार होता, परंतु असं काहीतरी घडलं की...! त्यात, R Ashwin च्या ट्विटने खळबळ

' तो मला किस करतच राहिला आणि ...' प्रिया बापटने सांगितला सेटवरचा अनुभव, म्हणाली...'त्याने मला चुकीच्या ...'

आता मनमानी पद्धतीने शाळांचे स्थलांतर होणार नाही! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवे नियम लागू

Latest Marathi News Live Update : मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

SCROLL FOR NEXT