Baramati Accident Sakal
पुणे

Baramati Accident: भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील वडिल जागीच ठार; तर उपचारा दरम्यान...

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी पोलीस हवालदार गणेश पवार यांना घटनास्थळी पाठवत पंचनामा केला.

सोमनाथ भिले

डोर्लेवाडी - बारामती वालचंदनगर रस्त्यावर सोनगाव हद्दीमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या चारचाकी हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील वडिल जागीच ठार झाले तर मुलाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सतीश रामदास पवार वय. (३८) मुलगा आर्यन सतीश पवार (वय १२) रा.आसू (ता. फलटण) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

मयत सतीश पवार व मुलगा आर्यन हे आपल्या दुचाकी क्र एम एच ११ सी एस ७४७२ वरून आज (ता.२९) रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास बारामतीच्या दिशेने जात असताना बारामतीकडून भरधाव वेगात येणारा हायवा ट्रक क्र एम एच ४२ ए.ओ.८२५५ यांची सोनगाव येथे समोरा समोर धडक झाली.

यामध्ये सतीश पवार हे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा आर्यन याला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याने आसू व सोनगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी पोलीस हवालदार गणेश पवार यांना घटनास्थळी पाठवत पंचनामा केला.

गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.दरम्यान गेल्या महिन्यात याच दिवशी (ता.२९) रोजी सोनगाव येथे एक लहान मुलगा ट्रकखाली येऊन ठार झाला होता. या दोन्ही घटनेने परिसरात संतप्त वातावरण तयार झाले असून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT