Pune, Ahilyabai Holkar Sakal
पुणे

Pune : बारामतीच्या अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावा ; जिल्हाधिकारी

बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी रुग्णालयातील सिटी स्कॅन व एक्स रे कक्षाची पाहणी केली.

मिलिंद संगई, बारामती.

Pune - येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी (ता. 10) बैठक घेत निर्देश दिले.

राज्य शासनाने जवळपास एक हजार कोटी रुपये खर्चून वैदयकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उभारले आहे. या ठिकाणी ओपीडी, सिटी स्कॅन, एक्सरे, विविध तपासण्या अशी कामे सुरु झाली आहेत. मात्र हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी प्रलंबित विषयांची माहिती घेत त्या बाबत संबंधित विभागांना जिल्हाधिका-यांनी सूचना केल्या. पायाभूत सूविधा, आस्थापनाविषयक बाबी तसेच औषधे व साहित्य खरेदी आदींचा आढावा घेतला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, तहसिलदार गणेश शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल शिंदे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, रुग्णालयातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा अनुषंगाने कार्यवाही करावी. रुग्णालय आवारात 12 लाख लिटर इतक्या क्षमतेची टाकी बांधण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. पाण्याच्या टाकीबाबत प्रस्ताव तयार करताना पुढील तीस वर्षातील वाढीव लोकसंख्या विचारात घ्यावी.

रिक्त पदांची आवश्यकता लक्षात घेता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत विचार करावा. रुग्णालयाच्या सुरक्षितेतच्यादृष्टीकोनातून सुरक्षा रक्षकांची भरती करणे, रुग्णालयातील साहित्य व औषधे खरेदी प्रकियेबाबत पाठपुरावा करावा.

आयुष प्रसाद म्हणाले, रुग्णालयाला अनुज्ञाप्ती (लायसन्स) मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांनी रुग्णालयातील कामकाजाची माहिती दिली. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी रुग्णालयातील सिटी स्कॅन व एक्स रे कक्षाची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

Latest Marathi News Live Updates : पावसाचा मध्य रेल्वेला फटका, ठाणे स्थानकांमध्ये प्रवाशांची झुंबड

Cheek Fat Reduction: वाढलेले गाल अणि डबल चिनमुळे हैराण आहात? मग हे सोपे घरगुती उपाय आजच करून पाहा

SCROLL FOR NEXT