Railway sakal
पुणे

गुरुवारपासून पुणे-बारामती व बारामती-दौंड रेल्वे सेवा होणार सुरु

जवळपास दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद पडलेली रेल्वेसेवा पुन्हा अंशतः सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.

मिलिंद संगई,

जवळपास दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद पडलेली रेल्वेसेवा पुन्हा अंशतः सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.

बारामती - जवळपास दोन वर्षांपासून कोविडमुळे (Covid) बंद पडलेली रेल्वेसेवा (Railway Service) पुन्हा अंशतः सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. गुरुवारपासून (Thursday) (ता. 27) पुणे ते बारामती व बारामती ते दौंड अशा दोन फे-या केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

वास्तविक बारामती पुणे अशी रेल्वे सेवा सुरु करण्याची बारामतीकरांची मागणी होती, प्रत्यक्षात ही मागणी पूर्णच झालेली नसून सध्या तरी अंशतः रेल्वे सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

गुरुवारपासून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरुन दहा डब्यांची डेमू रेल्वे सुटेल. ती पावणेनऊ वाजता दौंड रेल्वे स्थानकावर येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन ती मळदगाव, शिरसाई, कटफळ मार्गे बारामतीत सव्वा दहा वाजता दाखल होईल. हीच गाडी तीन तासांचा थांबा बारामतीत घेऊन पुन्हा दुपारी सव्वा एक वाजता दौंडकडे रवाना होईल. दौंडला ही गाडी दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.

रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिकीट काढताना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिर्व्हसल पास दाखवावा लागणार आहे, 18 वर्षांखालील मुलांना वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे. दरम्यान रेल्वेने ही सेवा सुरु करण्यासाठी पूर्ण तयारी केल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

बारामतीकरांची गैरसोय कायमच राहणार...

रेल्वेने बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी सकाळी व दुपारची गाडी पुन्हा पूर्ववत सुरु करावी अशी बारामतीकरांची मागणी होती. प्रत्यक्षात पुण्याहून बारामतीला येण्याची सोय झाली पण बारामतीहून पुण्याला जाण्याची सोयच झाली नाही अशी भूमिका बारामतीकरांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E85 Fuel: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोलपेक्षा स्वस्त E85 इंधन लॉन्च; आता किती आणि कशी बचत होणार?

महिलेचा गोळी लागून मृत्यू, भाजप आमदाराला कोर्टानं ८ वर्षांनी ठरवलं दोषी

मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री! रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूरचा काही भाग व्यापला; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

IND vs AFG: विराट कोहलीच्या बदली खेळाडूची BCCI ने केली घोषणा! ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूला मिळाली वनडे संघात जागा

Latest Marathi News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पीएम-आर्थिक सल्लागार परिषदेची महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT