Pune  Sakal
पुणे

Pune : बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी जय पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आगामी नगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदलास प्रारंभ केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आगामी नगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदलास प्रारंभ केला आहे. आज स्वताः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांना बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र दिले.

गेल्या अनेक महिन्यांपासून संघटनात्मक फेरबदलाची मागणी कार्यकर्त्यांमधून होत होती. मावळते अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांचा कार्यकाळही संपलेला होता व नव्याने पक्षबांधणीसाठी युवा कार्यकर्त्याची गरज होती. ही बाब ओळखून जय पाटील यांच्यावर अजित पवार यांनी ही जबाबदारी सोपवली.

जय पाटील हे नगरसेवक व उपनगराध्यक्ष होते, त्यांनी वृक्षारोपणाच्या मोहिमेत उल्लेखनीय काम केले आहे. नगरसेवकपदाच्या काळात त्यांनी विविध विकासकामांमध्ये सक्रीय योगदान दिलेले आहे. संयमी व मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने अजित पवार यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे.

भाजपने मिशन बारामतीचा नारा दिला आहे, लोकसभेच्या दृष्टीने भाजपची तयारी सुरु झाली असून बारामतीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे, त्या पार्श्वभूमीवरही राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बदलाकडे पाहिले जात आहे. आगामी काळात अधिक आक्रमकपणे काम करण्याची गरज लक्षात घेऊनही राष्ट्रवादीने संघटनात्मक फेरबदलास प्रारंभ केला आहे. दरम्यान सर्वांना विश्वासात घेऊन संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावीपणे करणार असल्याचे जय पाटील यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT