मोडनिंबमध्ये साडेनऊ लाखांचे रेशनचे धान्य जप्त! तिघांविरुद्ध गुन्हा दाखल Canva
पुणे

Pune : बारामतीत 38 लाखांचे प्रतिबंधित भेसळयुक्त पदार्थ जप्त

पोलिस कर्मचारी अभिजित एकशिंगे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दादा पिसाळ याने शरद सोनवणे याच्या सांगण्यानुसार कर्नाटकातून हिरा पानमसाला, रॉयल 717 सेंटेड तंबाखू असा 38 लाख 40 हजारांचा माल आणला होता.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - तालुक्यातील चौधरवस्तीनजिक असलेल्या गोदामातून पोलिसांनी तब्बल 38 लाखांचे प्रतिबंधीत अन्न भेसळयुक्त पदार्थ जप्त केले. या प्रकरणी दादा उर्फ नारायण रमेश पिसाळ (रा. बारामती), शरद सोनवणे (रा.सांगोला, जि. सोलापूर) व प्रशांत गांधी (रा. बारामती) (पूर्ण नावे नाहीत) यांच्या विरुध्द भा.दं.वि 1860 चे कलम 328, 188, 272,273, अन्न सुरक्षा मानके अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी अभिजित एकशिंगे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दादा पिसाळ याने शरद सोनवणे याच्या सांगण्यानुसार कर्नाटकातून हिरा पानमसाला, रॉयल 717 सेंटेड तंबाखू असा 38 लाख 40 हजारांचा माल आणला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या बाबत कारवाई केली.

सदर माल असलेला टेंपो पुढील विक्रीसाठी प्रशांत गांधी यांच्या गोदामात आणून लावण्यात आला होता. त्या मुळे मानवी जिवीतास धोका उत्पन्न होईल अशा स्वरुपाच्या मालाची वाहतूक व विक्रीचा उद्देश विचारात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरिक्षक राहुल घुगे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT