Ajit Pawar sakal
पुणे

Ajit Pawar : बारामती भाजपकडून अजित पवारांच्या अभिनंदनाचे फलक, मोदी शहा नड्डांसह अजित पवारांचे झळकले छायाचित्र

शहराच्या मध्यवर्ती भागात नगरपालिकेच्या समोरच हा बॅनर लागल्याने आज शहरात हा चर्चेचा विषय होता.

मिलिंद संगई, बारामती..

Ajit Pawar - राज्यातील नाटयमय सत्तांतरानंतर आता बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चाणक्याची उपमा देत अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. बारामतीत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो असलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो झळकल्याने या बॅनरची जोरदार चर्चा झाली.

शहराच्या मध्यवर्ती भागात नगरपालिकेच्या समोरच हा बॅनर लागल्याने आज शहरात हा चर्चेचा विषय होता. एरवी राजकीय कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बारामतीच्या आमदारांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि या प्रक्रीयेत महत्वाची भूमिका बजाविणा-य देवेंद्र फडणवीस यांनाही चाणक्याची उपमा देत अभिनंदन करत भाजपनेच बाजी मारल्याचे दाखवून दिले आहे.

अजित पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरुन कौतुक करत भाजप सोबतच आगामी निवडणूका लढविणार असल्याचे सुतोवाच केलेले होते. त्या मुळे भाजपनेही अजित पवार यांचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे. बारामतीत लागलेल्या या बॅनरची सगळीकडेच त्या मुळे चर्चा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT