अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे कोट्यवधींचे नुकसान Sakal
पुणे

बारामती : अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे कोट्यवधींचे नुकसान

दोन दिवस अवकाळी पावसाने बारामती व इंदापूर दोन तालुक्यात द्राक्ष पिकांचे कमालीचे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बारामती : तालुक्यात दोन तीन दिवस सुरु असलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना कमालीचा फटका बसला असून द्राक्ष बागायतदारांचे अक्षरशः कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दोन दिवस अवकाळी पावसाने बारामती व इंदापूर दोन तालुक्यात द्राक्ष पिकांचे कमालीचे नुकसान झाले आहे. एकट्या काटेवाडी परिसरात अंदाजे एक हजार एकर क्षेत्रावर जवळपास 250 शेतक-यांनी द्राक्षाचे पिक घेतले होते. या मध्ये तयार झालेल्या द्राक्षांचे घड अवकाळी पावसाने झडून गेले तर काही ठिकाणी द्राक्षाचे मणी फुटून नुकसान झाले आहे. काटेवाडी परिसरातील शेतक-यांचेच जवळपास एक कोटींचे नुकसान झाले आहे.

काही द्राक्ष विक्री साठी तर काही द्राक्ष वायनरीसाठी पाठवली जातात. या पावसाने या दोन्ही द्राक्षांचे अतोनात नुकसान झालेले असल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. ढगाळ हवामान, कधीही येणारा पाऊस याने यंदा द्राक्षापासून किती उत्पन्न मिळणार या बाबत उत्पादक साशंक आहेत.

यंदा बंगलोर, माणिकचमन, काशी गणेश, अनुष्का यासारख्या व्हरायटीची द्राक्षे घेतलेली होती. या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याची भावना उत्पादकांनी बोलून दाखवली. तयार झालेली आणि वायनरी साठी जाणारी या परिसरातील तीनशे एकरांवरील द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. वायनऱी साठी केल्या जाणा-या द्राक्षांपासून सर्वसाधारणपणे एकरी अडीच लाखांचे उत्पन्न मिळते तर इतर द्राक्षांपासून बाजारातील दरानुसार चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते.

नुकसानभरपाई मिळावी....

या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागांचे कमालीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने उत्पादकांना नुकसानभरपाई द्यायला हवी. शासन स्तरावर नुकसान होऊन अजूनही कोणी पंचनाम्यासाठीही आलेले नाही. – प्रशांत सुरेश काटे, काटेवाडी. बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Cotton Market : कापूस बाजारात 'मंदीची' सरकी; १५ लाख गाठींचे उद्दिष्ट असताना साडेसात लाखांवरच हंगाम आटोपला!

रायगडाच्या पायवाटेवर 'कमळी'चा स्वराज्याचा जागर! चित्रीकरणादरम्यान विजया बाबर झाली भावूक; म्हणाली...

Jalgaon News : जळगावात थरार! सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे जळून खाक, डोळ्यांदेखत संसाराची झाली राखरांगोळी

Latest Marathi News Update : धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात ‘दूषित’ पाणीपुरवठा

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT