चिंकारा शिकार प्रकरणी चौघांना अटक  Sakal
पुणे

बारामतीमध्ये चिंकारा शिकार प्रकरणी चौघांना अटक

पणदरे वनपरिक्षेत्रात चिंकारा हरणासह सहा सशांची शिकार करणाऱ्या चौघांना अटक झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : बारामती तालुक्यातील पणदरे वनपरिक्षेत्रात चिंकारा हरणासह सहा सशांची शिकार करणाऱ्या चौघांना अटक झाली आहे. संबंधित आरोपींमध्ये साताऱ्यातल्या तिघांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यातल्या तिघांसह पाच जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानुसार आरोपींपैकी चौघांना अटक केली आहे.

त्यामध्ये वैभव सुभाष घाडगे (वय २६) संग्राम सुनील माने (वय २७ दोघेही सातारा रोड, ता. कोरेगाव जि. सातारा), तर सुनिल मारुती शिंदे (वय ४०), दादा रामभाऊ पवार (वय ३७ रा. आबाजीनगर, पणदरे) अशी वनविभागाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या शिकार प्रकरणातील पाचवा आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

विशेषतः बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर आदींनी वरील प्रकरणी निर्णायक भूमिका घेतल्यामुळे आरोपींच्या मुस्क्या आवळणे सोयीचे झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मंगळवार (ता.३०) रोजी मध्यरात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बारामती वनपरिक्षेत्रातील कर्मचारी सुभाष पानसांडे, नंदूकुमार गायकवाड, जयराम जगताप, सचिन काळे, प्रकाश लोंढे पणदरे परिक्षेत्रातील गट नंबर 435 मध्ये रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी वनविभागात बॅट-यांच्या हालचाली जाणवल्या.

वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठांच्या सूचनेनुसार घटनास्थळी छापेमारी केली. त्यावेळी संबंधित पाच आरोपी एक चिंकारा जातीचे हरीण आणि पाच सशांची शिकार करताना रंगेहात आढळून आले. मृत हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. पुण्याचे उपवनसंरक्षक मयुर बोठे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT