Baramati municipal corporation sakal
पुणे

Baramati : बारामतीचा माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक...नगरपालिकेला पाच कोटींचे मिळणार पारितोषिक

Baramati : बारामती नगरपालिकेस माझी वसुंधरा अभियानात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कामगिरीसाठी पालिकेला पाच कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे, ज्याचा उपयोग पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी होईल.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत बारामती नगरपालिकेस नगरपरिषद व नगरपंचायत विभागात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या मुळे बारामती नगरपालिकेस पाच कोटी रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या बाबत माहिती दिली.

1 एप्रिल 2023 ते 1 मे 2024 या काळात माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील 414 नागरी संस्था व 22218 ग्रामपंचायती अशा 22632 स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग नोंदविला होता.या मध्ये 50 हजार ते एक लाख लोकसंख्या गटविभागात बारामती नगरपालिकेस राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

तीन वर्षांपूर्वी बारामती नगरपालिकेचा क्रमांक तळामध्ये होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या नंतर या अभियानामध्ये बारामतीचा क्रमांक वरचा कसा येईल या दृष्टीने प्रयत्न केले. तीन वर्षात नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व त्यांच्या टीमने अथक परिश्रम करत आज राज्यात प्रथम क्रमांकापर्यंत मजल मारली आहे.

दरम्यान बारामती नगरपालिकेस बक्षीसाच्या मिळणा-या पाच कोटी रुपयांच्या रकमेचा विनियोग निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी करावा लागणार आहे. वृक्षसंवर्धन, रेनवॉटर हार्वेस्टींग, जलसंवर्धन, सौरउर्जेला प्रोत्साहन अशा कामांसाठी या पारितोषिकाची रक्कम नगरपालिकेला खर्च करता येणार आहे.

पारितोषिकाची निम्मी रक्कम नगरपालिकेला तातडीने मिळणार असून उर्वरित रक्कम विनियोगाचा प्रकल्प अहवाल सादर करुन शासनाची त्यास मान्यता मिळाल्यानंतर मिळेल.बारामती नगरपालिकेच्या सर्वच विभागांनी या अभियानात मनापासून काम केले, नागरिकांनीही या प्रयत्नांना साथ दिली, सातत्याने शहर स्वच्छतेसह इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. एक स्वच्छ, सुंदर व हरित शहर म्हणून बारामतीची ओळख राज्यभर झालेली असून आता या राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने या वर शिक्कामोर्तब झालेले आहे.

मुख्याधिका-यांचे परिश्रम महत्वाचे ठरले...

या अभियानात मुख्याधिकारी महेश रोकडे व त्यांचे सर्व विभागप्रमुख, स्वच्छतेची जबाबदारी असलेली एनडीके कंपनी, सर्व कर्मचारी व स्वच्छतादूत यांच्यासह बारामतीकरांनी दिलेले योगदान महत्वाचे ठरले. मुख्याधिका-यांनी केलेले सूक्ष्मनियोजन व स्पर्धेच्या दृष्टीने केलेली तयारी या मुळे बारामतीचा राज्यात प्रथम क्रमांक आला.

राष्ट्रीय स्तरासाठी आता प्रयत्न....

देशातील म्हैसूर व इंदौर या दोन शहरांनी स्वच्छता अभियानात राष्ट्रीय स्तरावर जे सातत्य ठेवलेले आहे, त्या शहरांना भेट देत पाहणी करुन बारामती शहराचा नावलौकी राष्ट्रीय स्तरावर कसा नेता येईल याचा भविष्यात प्रयत्न करणार आहोत- महेश रोकडे, मुख्याधिकारी, बा.न.प, बारामती.

मिलिंद संगई, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT