MP Supriya Sule esakal
पुणे

Supriya Sule : 'आधी नागपूर होते, आता पुणे बनले राज्यातील गुन्हेगारीचे केंद्र'; खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

MP Supriya Sule : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.

मिलिंद संगई, बारामती

''राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. पुण्यात (Pune) सातत्याने गुन्हेगारी वाढत आहे. हा डेटा केंद्राचा आहे, मी म्हणत नाही.''

बारामती : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक असून राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. गेल्या काही वर्षात नागपूर हे गुन्हेगारीचे केंद्र होते. आता मात्र ते केंद्र पुण्याकडे आल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.

बारामती संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) स्वागतासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या, त्याप्रसंगी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पुण्यात महिला पोलिसांवर झालेल्या हल्ल्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. पुण्यात (Pune) सातत्याने गुन्हेगारी वाढत आहे. हा डेटा केंद्राचा आहे, मी म्हणत नाही.

रवींद्र वायकर यांना नुकतीच त्यांच्यावरील आरोपासंदर्भात क्लीनचीट मिळाली आहे. या संदर्भात विचारले असता सुळे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाचे नेते आधी विरोधकांवर आरोप करतात, त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्र पक्षात प्रवेश करुन घेतात आणि नंतर मंत्री, आमदार किंवा खासदार होतात. भारतीय जनता पार्टी ही आता भ्रष्टाचारी लोकांची टोळी बनली आहे.

रवींद्र वायकर हे भ्रष्टाचारी आहेत की, नाही हे फक्त देवेंद्र फडणवीस सांगू शकतात. जे महाराष्ट्रातले आमदार, खासदार आज तुमच्याबरोबर आहेत, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केले ते सिद्ध झाले नाहीत, त्याची एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागितली पाहिजे, नक्की भ्रष्टाचार कोण करत आहे. हे फक्त महाराष्ट्र पुरतं मर्यादित नाही, संपूर्ण देशात केंद्रीय संस्थांचा तपास मागे लावायचा, नंतर वॉशिंग करायचं आणि पक्षात घ्यायचं, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांना दिले पत्र...

सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीबाबत पत्र दिले आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी पत्र लिहिले आहे. याचे कारण की, अमोल कोल्हे आणि मला निधी मिळत नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागत आहोत. आम्ही निवडून आलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहोत. पाच टक्क्यांचा तर आमचा अधिकार आहे ना? आम्ही आमच्या कामासाठी निधी मागत नाही. लोकांचा विकास हवा आहे. आम्हाला क्रेडिट नको. आमचं काम आहे, लोकांच्या सेवेसाठी आम्ही निधी मागत आहोत.

महाराष्ट्रातलं सरकार बदलणार...

महाराष्ट्रातील सरकार येत्या ऑक्टोबरमध्ये बदलणार आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दुधाला भाव नाही. सातत्याने बदलणारी सरकारची पॉलिसी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT