3kmapp 
पुणे

३km वर लाखाची मोहोर;व्यावसायिक,ग्राहकांचा वाढता प्रतिसाद;खरेदी-विक्रीसाठी पसंती

सकाळवृत्तसेवा

पुणे - स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी हक्काची ऑनलाइन बाजारपेठ ठरलेल्या ३km ॲपवर नागरिकांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. पंधरा दिवसांत ३km ने एक लाख डाउनलोडचा टप्पा ओलांडला आहे. व्यावसायिक आणि ग्राहकांनी या नव्या डिजिटल  व्यासपीठास प्रतिसाद देत व्यवसाय वृद्धीचे नवे दमदार पाऊल टाकले आहे.

३km चे अधिकृत उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच या ॲपला डिजिटल जगतात पसंती मिळाली आणि पन्नास हजार डाउनलोडचा टप्पा पूर्ण झाला. ही घौडदौड कायम ठेवून पंधरा दिवसांच्या कालावधीत या ॲपने एक लाख डाउनलोडचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. या ॲपद्वारे आता खरेदी आणि विक्रीला डिजिटल जगतात सर्वाधिक पसंती मिळाली आहे. छोटे आणि घरगुती व्यावसायिक, विक्रेते यांना या ॲपद्वारे नवी ओळख मिळाली असून, व्यवसायवृद्धीचे चांगले साधनही मिळाले आहे.

कोरोनामुळे सर्वच व्यवसायांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत आणि ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड वाढला. हाच बदल हेरून ‘सकाळ’ने हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे.

असे आहेत ॲपचे  प्रमुख फायदे
  व्यावसायिकांसाठी  ॲप फायदेशीर
  आपला व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार
  वस्तू घरपोच देण्याची सोय
  उत्पादनांचे लिस्टिंग करता येईल
  स्वतःचा ब्रॅंड तयार होणार
  जमा-खर्च हिशेब ठेवता येईल
  दुकान व उत्पादनानुसार वस्तू ग्राहकांना शोधता येणार
  व्यवसायाचे व्यवस्थापन होणार सुलभ 

२४ तासांच्या आत डिलिव्हरी

  •   ॲपवर ग्राहकाने वस्तूचे बुकिंग केल्यानंतर २४ तासांच्या आत घरपोच डिलिव्हरी केली जाणार
  •   अडीच किलोपर्यंत वजन असलेले 
  • पार्सल ३० रुपयांत घरपोच मिळणार 
  •   पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्याही ठिकाणी सुरक्षितपणे 
  • पार्सल पोचवले जाईल
  •   उपलब्ध सेवांमधील सर्वांत किफायतशीर सेवा मिळणार
  •  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT