rain sakal
पुणे

Pune : भामा आसखेड मधून विसर्ग वाढविला

भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे

रूपेश बुट्टेपाटील

आंबेठाण : धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या धरणाच्या चारही दरवाजातून १२०७ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. त्यासाठी धरणाचे दरवाजे दहा सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहे.धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने विसर्ग कमी जास्त केला जात आहे. सुरुवातीला हा विसर्ग ६०४ क्यूसेसने सुरू होता. त्यांनतर त्यात वाढ करण्यात आली आहे.

खेड,शिरूरसह पुणे महानगरपालिकेला वरदान ठरलेल्या भामा आसखेड ( ता.खेड) धरणात सध्या ९८.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ९६.४२ टक्के पाणीसाठा होता. भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून १०२७ मीमी पावसाची नोंद झाली आहे

धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ८.०४ टीएमसी म्हणजे ९८.५९ टक्के असून उपयुक्त पाणीसाठा हा ७.५६ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ९६.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

पावसाचे प्रमाण असेच राहिले तर धरणातून विसर्ग अजून वाढवावा लागेल अशी माहिती भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे, शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख आणि कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी पुण्याच्या खाऊ गल्ल्यांना आणलं वठणीवर; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २.२३ कोटींचा अन्नसाठा जप्त

Satara Gram Panchayat Election : साताऱ्यातील गावपुढाऱ्यांचा हिरमोड! तब्बल 1350 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर; 'या' एका कारणामुळे निवडणुका थेट 2027 मध्येच?

Cyclone Akvan: ‘अकवन’ चक्रीवादळाचा धोका; आरोग्य यंत्रणा, बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : मावळमध्ये डी-मार्टवर अन्न प्रशासनाची धडक कारवाई

Gold Rate Today: अर्ध्या तासात सोनं-चांदीचे भाव कोसळले! 365 दिवसांतील सर्वात स्वस्त भाव; तुमच्या शहरात सोनं कितीला?

SCROLL FOR NEXT