Water Sakal
पुणे

पुणे: भांडारकर, प्रभात, विधी महाविद्यालय रस्ता परिसरात पाणी समस्या

दररोज तीस ते चाळीस टॅंकरची मागणी

समाधान काटे

शिवाजीनगर : कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला वारंवार कळवून देखील काही उपाययोजना होत नाहीत. भांडारकर, विधी महाविद्यालय, बी.एम.सी.सी रस्ता या भागात पाण्याची खूप मोठी समस्या आहे. या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.

असं सांगत होत्या डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या अध्यक्षा स्मिता काळे. वरिल परिसरात मागील पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी समस्या जाणवू लागल्याने रहिवाशांना विकत पाणी टॅंकर मागवावे लागत आहेत. दिवसभरात तीस ते चाळीस टॅंकर विविध सोसायट्या मध्ये पाणीपुरवठा करतात. विशेष म्हणजे प्रभात रस्त्यावर गल्ली नंबर दोन, तीनला खूपच कमी प्रमाणात पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीधर कामत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्या भागात पाणीपुरवठा करणारे अधिकारी दररोज सकाळी तिथं समस्या सोडविण्यासाठी जात आहेत. पाण्याचा दाब का कमी झाला हे तपासण्याचे काम सुरू आहे. पाइपलाइनमध्ये दगड, पाणी बाटली वगैरे अडकली असेल तर ती वरुन दिसत नाही. त्यासाठी पाइपलाइनची व्यवस्थीत तपासावी करावी लागेल.

या भागात सर्वात जास्त पाण्याची समस्या

संपूर्ण डेक्कन जिमखाना सोसायटी, स्मृती भांडारकर लेन नंबर तीन, सरस्वती अपार्टमेंट,सावता माळी सोसायटी भंडारकर रोड, शिवनेरी सोसायटी भंडारकर रोड, धनंजय आपारमेंट भंडारकर रोड , संपूर्ण अमराई कॅम्प डेक्कन जिमखाना

वारंवार तक्रार केल्यानंतर एक दिवस जास्त दाबाने पाणीपुरवठा केला जातो, पुन्हा जैसे थे असते. महापालिकेचे टॅंकर वेळेत येत नसल्याने नागरिकांना खाजगी टॅकरकडे वळावे लागते. पाणीपुरवठा अधिकारी आणि टॅकर माफीया यांच्यात संगनमत असल्याची दाट शक्यता वाटते. वेळेवर कर भरणाऱ्या लोकांची पिळवणूक चालली आहे. अधिकारी निष्क्रिय झाले आहेत. सध्या जे पाणी येतं त्यामधून खालच्या टाक्या देखील भरत नाहीत.

- रहिवासी सुनील पांडे भांडारकर रस्ता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT