bus stop sakal
पुणे

Pune Bus Stop: बिबवेवाडी बस थांबा तीन वर्षापासुन प्रतिक्षेतच

बस थांबा शेड नसल्या बाबत सकाळने अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे

सकाळ वृत्तसेवा

-नितीन बिबवे.

बिबवेवाडी : स्वामी विवेकानंद मार्गावरील गावठाण चौकात अप्पर च्या बाजूला असणारे बस थांबा शेड तीन वर्षापूर्वी काढलेले ते अद्याप बसविण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना उन्हा पावसात रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे.

स्वामी विवेकानंद मार्गाचे सीमेंट काँक्रीटकरण करताना प्रेम नगर सोसायटी, ईएसआय हॉस्पिटल, बिबवेवाडी गावठाण, इंदिरा नगर, अप्पर येथील बस थांबा शेड काढलेले आहेत ते अद्याप बसविण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना ऊन पावसात रस्त्यावर उभे राहून रस्त्याच्या मध्यावर जाऊन जीव धोक्यात घालून बस पकडावी लागत आहे.

गावठाण चौकात सहा शाळा असून परिसरातील सुमारे वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे परंतु बस थांबा शेड नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर किंवा दुकानांच्या आडोशाला उभे राहून बसची वाट पाहत थांबावे लागते.

अनेक वेळा बस थांब्याच्या जागेवर बस थांबली नाही तर विद्यार्थी चौकातील वाहतूक सिग्नलला बस थांबल्यानंतर जीव धोक्यात घालून बस पकडतात त्यामुळे अपघात होतात.

बस थांबा शेड नसल्या बाबत सकाळने अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे, नागरिकांनी अनेक वेळा पीएमपीएलला बस थांबा शेड बसवण्याची मागणी केली आहे परंतु प्रशासनाने अद्याप बस थांबा शेड लावले नाहीत.

आरती कुंजीर ( पालक ) :

बस थांबा शेड नसल्यामुळे मुलांना घेऊन पावसात रस्त्यावर उभे रहावे लागते नाहीतर दुकानाच्या आडोशाला उभे राहून बसची वाट पहावी लागते.

निरंजन तुळपुळे ( स्थापत्य विभाग अधिकारी ) :

शहरात तिनशे नवीन बस थांबे लावण्यात येणार आहेत, बिबवेवाडी गावठाण चौकातील बस थांबा लवकरच बसविण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : वासनांध खरातच्या 'शिवनिका'च्या उत्पन्नात 7 वर्षांत तब्बल 74 पटींनी वाढ; 'धर्मादाय'कडे सादर केलेल्या लेखापरीक्षणातून गंभीर बाब उघड

काव्या होणार आई पण नंदिनीच्या नशिबी ते सुख नाही ! मालिकेतील नवीन ट्विस्टने प्रेक्षक नाखुष

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT