Biogas Project sakal
पुणे

Biogas Project : दुर्गंधीमुळे बारामतीतील बायोगॅस प्रकल्प तात्पुरता बंद

सदर प्रकल्पामुळे मुळे मारवाड पेठ, कचेरी रोड, गोकुळवाडी, सिद्धेश्वर गल्ली, भिगवण चौक, स्टेशन रोड, बुरुड गल्ली, कसबा या भागात रोज सायंकाळी दुर्गंधी येत असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भावना असल्याचे सस्ते व पाटसकर यांनी सांगितले.

मिलिंद संगई, बारामती.

Biogas Project - बारामती शहरातील कदम चौकानजिक असलेल्या बायोगॅस प्रकल्पामुळे अनेक भागात दुर्गंधी येत असल्याची अनेक नागरिकांनी तक्रार केली. दोन दिवस मळीसदृश वासाने मध्यवर्ती शहरातील नागरिक हैराण झाले होते.

दरम्यान या बायोगॅस प्रकल्पाबाबत तक्रारी आल्याअसून दोन दिवस हा प्रकल्प बंद ठेवून तपासणी केली जात असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. माजी नगरसेवक सुनील सस्ते व मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर यांनी या बाबत मुख्याधिका-यांना भेटून नागरिकांच्या भावना त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचे आज नमूद केले.

सदर प्रकल्पामुळे मुळे मारवाड पेठ, कचेरी रोड, गोकुळवाडी, सिद्धेश्वर गल्ली, भिगवण चौक, स्टेशन रोड, बुरुड गल्ली, कसबा या भागात रोज सायंकाळी दुर्गंधी येत असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भावना असल्याचे सस्ते व पाटसकर यांनी सांगितले.

दोन दिवस प्रकल्प बंद ठेवणार

या प्रकल्पामुळे दुर्गंधी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर दोन दिवस प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वस्तुस्थिती तपासून या बाबत पुढील निर्णय घेऊ. सन 2012 पासून हा प्रकल्प येथेच कार्यान्वित आहेत, इतक्या वर्षात दुर्गंधी कधीच पसरलेली नव्हती, त्या मुळे या दुर्गंधीची उत्पत्ती नेमकी कोठून होते याचा शोध सुरु आहे- महेश रोकडे, मुख्याधिकारी, बा.न.प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारूने मृत्यूआधी दृष्टी अधू झाली, तोंडाला फेस आला; आतापर्यंत २१ मृत्यू, २२ अधिकाऱ्यांचे निलंबन

Ebola Virus: इबोला व्हायरसचा उद्रेक! ९०० हून अधिक जणांना संसर्ग, २२३ रुग्णांचा मृत्यू; नवीन स्ट्रेन किती धोकादायक?

Mumbai: ब्रेकऐवजी एक्सिलरेटरवर पाय, कारखाली चिरडून महिलेसह चिमुकल्याचा मृत्यू; मुंबईत भीषण अपघात

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

IPL 2026 : शतक केलं, GT ला फायनलमध्येही नेलं अन् मग शुभमन गिलनं आई-वडिलांना मैदानातच मारली कडकडून मिठी; Video Viral

SCROLL FOR NEXT