Mother and Daughter sakal
पुणे

Pune News : जन्मदात्रीने नाकारले, पण सावत्र आईने स्विकारले!

सावत्र आईकडून मुलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या घटना आपण चित्रपटांमधून पाहतो, अनेकदा आपल्या सभोवतालीही अशा घटना निदर्शनास येतात.

प्रशांत पाटील, सकाळ वृत्तसेवा

सावत्र आईकडून मुलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या घटना आपण चित्रपटांमधून पाहतो, अनेकदा आपल्या सभोवतालीही अशा घटना निदर्शनास येतात.

पुणे - सावत्र आईकडून मुलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या घटना आपण चित्रपटांमधून पाहतो, अनेकदा आपल्या सभोवतालीही अशा घटना निदर्शनास येतात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात सावत्र आई विषयीची "नकारात्मकता' आपसुकच येते. पण पुण्यातील एका घटनेने त्यास छेद दिला आहे. एकीकडे जन्मदात्रीने आर्थिक कारणामुळे पोटच्या गोळ्याला सांभाळण्यास नकार दिला, या सगळ्या घटनेमध्ये अवघ्या आठ वर्षाच्या लेकराची ससेहोलपट सुरुच होती, अखेर सावत्र आईने त्या मुलाचा हक्क मिळावा म्हणुन न्यायालयात दाद मागितली, अन्‌ न्यायालयानेही त्या मातृह्दयाची साद ऐकत मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आनंदाने सोपविली !

मराठी, हिंदी अशा कोणत्याही चित्रपटामध्ये सावत्र आईची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने पुढे आणण्यात आली आहे. समाजात घडणाऱ्या सत्य घटनांचेच प्रतिबिंब अशा चित्रपटांमध्ये उतरल्याशिवाय राहात नाही. परंतु सावत्र आईबद्दलची नकारात्मकता पुसून टाकण्याचे काम पुण्यातीन घटनेने केले आहे. तर घटना अशी आहे. एका उच्चशिक्षित शासकीय अधिकाऱ्याचा पहिलं लग्न झाले होते. त्याच्या दोन्ही मुली परदेशात स्थायिक झाले. वीस वर्षानंतर संबंधित अधिकाऱ्याने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेत दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला मुलगा झाला. परंतु पुन्हा अधिकारी व त्याच्या दुसऱ्या पत्नीसमवेतही भांडणे सुरु झाल्याने त्याने तिच्यासमवेतही घटस्फोट घेतला. त्यावेळी त्यांचा मुलगा आठ वर्षांचा होता. एकाकी जीवन वाट्याला येऊ लागल्याने अधिकारी महोदयांनी पुन्हा पहिल्या पत्नीसमवेत जवळीक साधली. हा गोंधळ इथेच संपत नाही. तर संबंधित अधिकाऱ्याची भागलपुर येथे बदली झाल्यानंतर कोरोनामध्ये त्याचा मृत्यु झाला.

तेव्हा, त्यांचा आठ वर्षांचा मुलगा पाचगणीमध्ये शिक्षण घेत होता. वडीलांच्या निधनामुळे त्याचा शाळेतील प्रवेशही रद्द करुन घ्यावा लागला. दरम्यान, या सगळ्या गोंधळामध्ये मुलाच्या जन्मदात्या आईने त्यांच्या मुलाला अधिकाऱ्याची पहिली पत्नी व त्याच्या मुलींनी पळवून नेले असून त्याचा ताबा द्यावा, अशी मागणी केली. तेव्हा, सावत्र आईने मुलाला त्याच्या जन्मदात्या आईकडे सोपविण्यास संमती दिली. परंतु, जन्मदात्या आईने अचानक आर्थिक कारण पुढे करुन मुलाची जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला. या सगळ्या घडामोडींमध्ये लहानग्याला आश्रमात ठेवण्याची वेळ आली.

तेव्हा, सावत्र आईनेच पुढाकार घेत मुलाच्या पालकत्वाची जबाबदारी मिळावी, यासाठी ऍड.हेमंत झंजाड यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. ऍड.झंजाड यांनी हा प्रकरणातील सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानुसार, जन्मदात्या आईनेच आर्थिक कारणामुळे मुलाला सांभाळण्यास असमर्थता दर्शवित मुलाच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी सावत्र आईला देण्यास मान्यता दिली. त्यामुळे न्यायालयामध्ये युक्तीवाद ग्राह्य धरून मुलाच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्या सावत्र आईकडे सोपविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT