BJP_pune 
पुणे

अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार दडपशाही करतंय; भाजप नेत्याची टीका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार दडपशाही करीत असल्याची टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

पत्रकार अर्णव गोस्वामी यांना बुधवारी (ता.४) सकाळी राज्य सरकारने अवैध प्रकारे अटक केली. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने टिळक रस्त्यावरील अभिनव चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, सरचिटणीस गणेश घोष, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, संदीप लोणकर सहभागी झाले होते.

मुळीक पुढे म्हणाले, ‘पालघर येथील साधूंची हत्या आणि अभिनेता सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात अर्णव गोस्वामी यांनी स्पष्टपणे आणि ठामपणे प्रश्‍न विचारून महाविकास आघाडी सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले. म्हणून सूडबुद्धीने सरकारने गोस्वामी यांना अटक केली. गेल्या काही दिवसांत पत्रकारांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवून अवैध पद्धतीने अटक करण्यात येत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आणि ४५ वर्षांपूर्वीच्या आणीबाणीची आठवण करून देणारी आहे. राज्यात आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण करणार्‍या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाला पुन्हा धमकीचा मेल, अभिनेते अमिताभ बच्चन यांचाही उल्लेख

फक्त १० रुपयांत सोनं खरेदीची संधी! धनत्रयोदशीला 'या' ६ प्लॅटफॉर्मवर मिळतायत खास ऑफर्स

Latest Marathi News Update : शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण, भेटीचा वेगळा अर्थ काढू नका; सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली भूमिका

Diwali Padwa: नवऱ्याने बायकोला ओवाळणी देणे का गरजेचे? दिवाळी पाडव्याला भेटवस्तू न दिल्यास बसेल मोठा फटका; शास्त्र काय सांगते?

Ramayana Box Office: 'रामायण'ने करून दाखवलंच! पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये धुमाकूळ; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

SCROLL FOR NEXT