Crime
Crime Sakal
पुणे

सख्ख्या चुलतभावाकडून चाकू व कोयत्याने वार; एकजण गंभीर जखमी

निलेश बोरुडे

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) खडकवासला येथील कोल्हेवाडी परिसरात एका तरुणावर सख्ख्या चुलत भावाने कोयता व चाकूने वार केले असून यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. महेश मोहन दारवटकर(वय 26, रा. कोंडगाव ता. वेल्हे) असे जखमी तरुणाचे नाव असून चुलतभाऊ तुषार दारवटकर (वय 22, रा. कोंडगाव) हा फरार झाला आहे. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Pune Crime News)

मुख्य सिंहगड रस्त्यावर खडकवासला गावच्या हद्दीतील कोल्हेवाडी येथील एका हॉटेलच्या समोर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोघा भावांमध्ये झटापट सुरू होती. दोघांची झटापट सुरू असताना बघ्यांची गर्दीही जमली होती परंतु कोणीही भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. अचानक तुषार याने सोबत आणलेल्या चाकू व कोयत्याने महेशवर वार केले आणि पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार रामदास बाबर,अजय पाटसकर, पोलीस नाईक निलेश राणे, राजेंद्र मुंढे, दिपक गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हवेली पोलीसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT