Pune  sakal
पुणे

Pune : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढला

नगर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे पिलर हे बीआरटी मार्गात आल्याने हा बराचसा भाग वापरता येत नव्हता.

​ ब्रिजमोहन पाटील

Pune - नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून बीरआरटी मार्ग काढून टाकण्याची मागमी केली जात होती. अखेर आजपासून प्रशासनाने गेल्या पावणे तीन वर्षापासून बंद असलेला गुंजन टॉकीज चौक ते हयात हॉटेलपर्यंत बीआरटी मार्ग काढून टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान बीआरटी मार्ग प्रयोगिकतत्वावर काढला जात असल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.

नगर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे पिलर हे बीआरटी मार्गात आल्याने हा बराचसा भाग वापरता येत नव्हता. या रस्त्यावर रोज सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे बीआरटीचा मार्ग काढून टाकावा अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात होती.

यासंदर्भात आमदार सुनील टिंगरे यांनी विधिमंडळ अधिवेशनातही प्रश्‍न उपस्थित करून याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर यासंदर्भात महापालिका व वाहतूक पोलिसांच्या काही बैठकाही झालेल्या आहेत. त्यानुसार आज महापालिका प्रशासनाने सुमारे ५०० मीटर भागातील बीआरटी मार्गाचे रेलिंग आणि सिमेंटचे छोटे दुभाजक काढण्यास सुरवात केली आहे.

आमदार टिंगरे म्हणाले, ‘‘नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बीआरटी मार्ग काढून टाकावा अशी मागणी विधानसभेतही केली होती. त्याचा कायम पाठपुरावा सुरू होता.अखेर महापालिका व वाहतूक पोलिसांनी एकत्र येऊन गुंजन टॉकीज चौक ते हयात हॉटेलपर्यंत बीआरटी मार्ग प्रायोगिकतत्वावर काढला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल.

‘‘गुंजन टॉकीज चौक ते हयात हॉटेलपर्यंतचा बीआरटी मार्ग गेल्या पावणेतीन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे हा मार्ग काढून टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी होती. त्यामुळे आज प्रायोगिकतत्वावर याची अंमलबजावणी सुरू केली आहे.’’

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India : विसरून जा पैशाचं पाकीट अन् कागदपत्रे! प्रजासत्ताक दिनला पाहा भारताचे 4 'डिजिटल ब्रह्मास्त्र', ज्यांनी देशाला बदलून टाकलंय

बापरे! मराठमोळ्या रिलस्टारचं निधन, प्रथमेश कदमच्या जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का, आई-मुलाची होती सुपरहिट जोडी

Yuvraj Singh : ''पण तू १२ चेंडू फिफ्टी मारू शकत नाहीये''; अभिषेक शर्माबाबत युवराज सिंगची पोस्ट व्हायरल!

Republic Day 2026: संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारा फोटो! 77व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा खास लूक चर्चेत

Latest Marathi news Update : परेडमध्ये टी-९० भीष्म आणि अर्जुन रणगाडयांची गर्जना,नौदलाच्या संचलनात आयएनएस विक्रांतचा समावेश

SCROLL FOR NEXT