पुणे

पुण्यातील ‘बीआरटी’ होणार हद्दपार

CD

पुणे, ता. २२ : आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली विश्रांतवाडी चौक ते फुलेनगरदरम्यानचा ‘बीआरटी’ (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्ग काढून टाकण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत मंजुरीसाठी आला, त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी पुण्यातील ‘बीआरटी’ पूर्णपणे हद्दपार करण्याची मागणी केली. त्यानुसार स्वारगेट-कात्रज आणि नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’ मार्ग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार्यवाही पुढील आठ दिवसांत करा, असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
सातारा रस्ता, नगर रस्ता, हडपसर रस्ता आणि आळंदी रस्त्यावर टप्प्याटप्प्याने ‘बीआरटी’ सुरू झाली. यातील सोलापूर रस्त्यावरील बहुतांश ‘बीआरटी’ मार्ग काढून टाकला आहे. त्यानंतर नगर रस्त्यावरील जवळपास निम्मा ‘बीआरटी’ मार्गही काढला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत विश्रांतवाडी चौक ते फुलेनगरदरम्यानचा ‘बीआरटी’ मार्ग काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास महापालिका प्रशासनानेही सकारात्मक अभिप्राय दिला असून, ‘बीआरटी’ काढल्याने आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी होईल आणि दोन अतिरिक्त लेन खासगी वाहनांसाठी उपलब्ध होतील, असे अभिप्रायात नमूद केले होते.

‘बीआरटी’ काढण्याची उपसूचना :
महापालिकेच्या मुख्यसभेत आळंदी रस्त्यावरील ‘बीआरटी’ काढण्याचा प्रस्ताव आला. त्यावर निर्णय होत असताना हा निर्णय घेण्यापूर्वी पीएमपीच्या संचालक मंडळाचा अभिप्राय घ्यावा, अशी सूचना नगरसेवक अजय खेडेकर यांनी केली. त्यात आणखी वेळ जाईल. संचालक मंडळ मान्यता देईल, या भरवशावर ‘बीआरटी’ मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे मेट्रोच्या कामामुळे स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग काढावा लागणार आहे, असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले. त्याचवेळी नगर रस्त्यावरील उर्वरित ‘बीआरटी’ काढून टाकावी, अशी मागणीही आली. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज आणि नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’ काढून टाकावी, अशी उपसूचना सर्वपक्षीय नेत्यांनी मंजूर केली.

‘‘आळंदी रस्त्यासह स्वारगेट ते कात्रज आणि नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय मुख्यसभेत घेतला आहे. आषाढी वारीपूर्वी हे रस्ते मोठे केले जातील.’’
- गणेश बिडकर, सभागृह नेते

‘‘आळंदी मार्गावरील ‘बीआरटी’मुळे वारीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे आषाढी वारीपूर्वी पुढील आठ दिवसांत बीआरटी मार्ग प्रशासनाने काढून टाकावा.’’
- मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT