An under-construction building collapsed in Yerwada, Pune Sakal Digital
पुणे

Pune Building Collapse: इमारत कोसळल्याप्रकरणी चौघांना अटक

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बांधकाम मजूर मूळचे बिहारचे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यावसायिक संकुलाच्या इमारतीच्या पायात बसवण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांचा सांगाडा कोसळून झालेल्या अपघातात पाच कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक कंपनी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी, लेबर सुपरवायझर, सुरक्षा सुपरवायझर आणि बांधकामाशी संबंधित पदाधिकाऱ्यांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर यातील चौघांना अटक झाली आहे. संबधित दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बांधकाम मजूर मूळचे बिहारचे आहेत.(Pune Building Collapse in Yerawada Pune)

सदोष मनुष्यवधासह विविध कलमांनुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटनेत चार मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अहलुवालिया बांधकाम कंपनीचे संचालक मोहन अचलकर, एमसीपीएल कंपनीकडून काम करणारे ठेकेदार शरीफ, सीएनडब्ल्यू कंपनीचे सुरक्षाविषयक पर्यवेक्षक सतीश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. बांधकाम मजूर मोहम्मद नाहीद मोहम्मद मास्टर (वय २१, सध्या रा. लेबर कॅम्प, गुंजन चित्रपटगृहाजवळ, येरवडा, मूळ रा. बरसोई घाट, जि. कटिहार, बिहार) यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सेफ्टी सुपसायंकपसह चौघांना अटक

गुन्हा दाखल झालेल्या आरोपीपैंकी प्रोजक्टचा सिनिअर सेफ्टी सुपरवायझर इमतियाज अबुल बरकात अन्सारी (वय 38, रा. बिहार), लेबर कॉक्ट्रक्टर सुपरवायझर मोहम्मद शरीफ हबीबूल रहेमान आलम (वय 35, रा. बिहार), प्रोजक्ट मॅनेजर असिस्टंट विजय एकनाथ धाकतोडे (वय 25, रा. शिक्रापूर), प्रोजेक्ट मॅनेजर मजीद अलीसा खान ( वय 45, रा. बिहार) या चौघांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.

येरवडामधील शास्त्रीनगरमध्ये असलेल्या गल्ली क्रमांक आठमध्ये ब्ल्यू ग्रास बिजनेस पार्क या नियोजित व्यावसायिक संकुलाचे काम सुरू आहे. इमारतीचा पाया खोदण्याचे काम सध्या सुरू असून त्यावर लोखंडी सळयांपासून करण्यात आलेला मोठा सांगडा बसविण्यात आला आहे. गुरूवारी (ता. ३) रात्री अकराच्या सुमारास लोखंडी सांगड्याखाली दहा मजूर काम करत होते. त्यावेळी सांगड्याचा काही भाग मजुरांवर कोसळला आणि मजूर दबले गेले. या घटनेची माहिती तेथे काम करणाऱ्या मजुरांनी त्वरीत अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली.

अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल गिलबिले, विभागीय अधिकारी रमेश गांगड यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बंब, रेस्क्यू व्हॅन, रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. पायाचा विस्तार मोठा असल्याने आत नेमके कितीजण दबले गेले आहेत, याबाबतची माहिती सुरूवातीला मिळाली नव्हती. अंधार असल्याने प्रकाशझोत सोडून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. लोखंडी सांगड्याचा काही भाग कटरच्या सहाय्याने कापून जवान आतील भागात उतरले.

दबलेल्या दहा मजुरांचा अंधारात शोध घेण्यात आला. त्यांना तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त किशोर जाधव, येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान आदींनी घटनास्थळी भेट दिली. शेख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

मृत्यू झालेले कामगार :

- सोहेल मोहम्मद (वय २२)

- मोहम्मद समीम (वय ३०)

- महम्मद मोबिद (वय ४०)

- महम्मंद शाबुब आलम (वय ३५)

- ताजीब आलम (वय ४०)

जखमी झालेले कामगार :

- मोहम्मद आलम मोहम्मद इब्राहिम

- मोहम्मद फईम मोहम्मद कुरवान

- मोहम्मद रफीक आलम

- मोहम्मद साहील मोहम्मद मुस्लीम

नातेवाईकांना अश्रृ अनावर :

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले मजूर आणि जखमींना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मजूर तसेच त्यांच्या नातेवाईकांनी शवागारात गर्दी केली होती. येरवड्यातील एका वसाहतीत (लेबर कॅम्प) राहणाऱ्या मजुरांच्या नातेवाईकांना अश्रृ अनावर झाले. मजुरांच्या वसाहतीत शोककळा पसरली होती.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त :

या प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृत मजुरांप्रती शोक व्यक्त केला. पुण्यातील एका बांधकामाधीन इमारतीत झालेल्या दुर्घटनेचे दुख झाले. मला आशा आहे की, या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व लवकरात लवकर बरे होतील, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यतेखाली समिती :

या दुर्घटनेची गंभीर दखल घेत त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक अभिजित केतकर यांच्यासह बांधकाम विभाग, कामगार विभाग, बांधकाम संघटना आणि पालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT