Pune Building Collapse Sakal
पुणे

Pune Building Collapse: येरवडा घटनेच्या चौकशीसाठी शोध समिती

प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येरवडा येथे बांधकामाच्या ठिकाणी सळयांचा सांगडा अंगावर पडून मजुरांचा मृत्यू झाल्याचा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली आहे. तीन दिवसात या समितीकडून याप्रकरणाची चौकशी करून अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. याबाबत आज (ता. ४) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश काढले आहेत. तसेच या ठिकाणचे काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.(Pune Building Collapse case)

यासमितीमध्ये पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक अभिजित केतकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील गिलबीले, कामगार कल्याण विभागचे उपायुक्त अभय गिते, स्ट्रक्चरल इंजिनिअर धैर्यशील खैरेपाटील, क्रेडाईचे संजय देशपांडे, आर्किटेक्ट संदीप बावडेकर आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुधीर कदम यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश केला आहे.

गुरुवारी (ता.३) रात्री कल्याणीनगर येथील प्लॅट क्रमांक ३ येथे फारुक फ्रामाजी वाडिया व इतर यांच्याकडून व्यावसायिक टॉवर बांधले जात आहे. त्याच्या बेसमेटचे काम करण्यासाठी सळयांचा सांगडा तयार करण्यात आला होता. हा सांगडा काम करताना रात्री पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (ता.४) सकाळी या घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या ठिकाणचे काम थांबविण्याचे आदेश दिले आहे.

‘‘राज्य शासनाच्या नव्या बांधकाम नियमावलीनुसार अपघात झाल्यानंतर त्यात बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, ठेकेदार यांची जबाबदारी निश्‍चीत करून कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई होईल. बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शोध समितीमधून सर्व माहिती समोर येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’’

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका

महापालिकेच्या अधिकाऱ्यावरही कारवाई करा

कोंढवा येथे दुर्घटना झाल्यानंतर प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने तेथील मजुरांची माहिती महापालिकेला देणे, त्यांची कामगार आयुक्ताकडे नोंदणी करणे आवश्‍यक असल्याचे परिपत्रक काढले होते. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची कामगार आयुक्तांकडे नोंदणी नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करा, अशी मागणी रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे केली आहे. उपमहापौर सुनीता वाडेकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब जानराव यांनी ही मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

SCROLL FOR NEXT