An under-construction building collapsed in Yerwada, Pune Sakal Digital
पुणे

Pune Building Collapse: निष्काळजीपणामुळेच पाच कामगारांचा बळी

ही घटना निष्काळजीपणामुळेच झाली आहे असा निष्कर्ष जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या तांत्रिक तथ्य शोध समितीने काढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येरवडा येथील ब्लू ग्रास बिझनेस पार्क या इमारतीचे काम सुरू असताना सळयांची बांधणी अंगावर पडून पाच मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना निष्काळजीपणामुळेच झाली आहे असा निष्कर्ष जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या तांत्रिक तथ्य शोध समितीने काढला आहे. याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. (Pune Building Collapse Case Updates)

तथ्य शोध समितीच्या सदस्यांनी येरवड्यातील प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. प्रथमिक निष्कर्ष अहवालात ही दुर्घटना निष्काळजीपणामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यावर पुढील सुनावणी घेण्यासाठी प्रकल्पाचे विकसक, साइट इंजिनिअर, आर्किटेक्ट तसेच स्ट्रक्‍चरल इंजिनिअर यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आली असून, २५ फेब्रुवारी रोजी समिती समोर त्यांनी सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर अंतिम अहवाल समितीकडून सादर केला जाईल, असे समितीचे सदस्य सुधीर कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कदम म्हणाले ‘‘या समितीमधील प्रत्येक सदस्यांनी अपघात स्थळाची पाहणी केली त्यात महापालिकेची परवानगी, आर्किटेक्चरचा प्लॅन, प्रत्यक्षात जागेवर त्याच पद्धतीने काम झाले आहे का ?, चुकीच्या पद्धतीने काम केले असेल तर त्या चुका कोणत्या याची माहिती संकलित केली. अपघाताच्या ठिकाणच्या सुरक्षा उपाय योजना, कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, काम करताना कशा नियमानुसार झाले का, कामाच्या तपासणीसाठी साइट इंजिनिअर अथवा इतर जबाबदार व्यक्ती होत्या का याची तपासणी समितीने केली आहे.

प्राथमिक अहवालातील आक्षेप

-सळयांच्या जाळ्यांमध्ये उभारण्यात आलेल्या घोड्या (चेअर्स) पुरेशा नव्हत्या.

- जाळयांची बांधणी स्ट्रक्‍चरल ड्रॉईंगनुसार नव्हती.

- या प्रकल्पाच्या राफ्ट फाउंडेशनचे काम करताना लोखंडी जाळीची ठेवणी व बांधणी योग्य नव्हती.

- बांधकामाकडे जाणाऱ्या रस्त्याला सुरक्षा कठडे नव्हते.

- वरची जाळी व खालच्या जाळीत मजुर काम करत असताना त्या जाळ्या स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना नव्हती.

- दोन जाळ्यांना आधार देण्यासाठी सळयांचे पिलर उभे करणे आवश्‍यक होते, पण त्याऐवजी केवळ एल आकारातील सळयांचा आधार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT