Pune sakal
पुणे

Pune : मैदान सोडून बैलगाडी थेट नदी पात्रात, पुढे काय झालं?

दोन बैलांचा जीव जाता जाता थोडक्यात वाचला. त्यानंतर परत एक प्रेक्षक घाटाच्या मध्येच गेल्याने तोही जखमी झाल्याचे समजत आहे

संतोष आटोळे

Pune - इंदापूर तालुक्यातील शहा येथे आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये झालेल्या अपघातात एक जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले.तर तेथेच घडलेल्या दुसऱ्या घटनेत गाडा धावत असताना घाटाची योग्य रचना नसल्याने लगतच्या नदी पात्रात घुसत खोलवर गेला यावेळी आयोजकांसह प्रेक्षकांचा जीव टांगणीला गेला होता मात्र सुदैवाने दोन्हीही बैल गाड्या सह सुखरूप बाहेर आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

मात्र असे प्रकार यापुढे घडू नयेत म्हणून अयोजकांसह प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहा येथे माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात होते.यामध्ये 250 पेक्षा अधिक बैलगाडा चालकांनी सहभाग घेतला.

मात्र नियोजनाच्या अभावामुळे बैलगाडा शर्यत चालू असताना बाजूला उभा राहून शर्यत पाहणाऱ्या शिवाजी बाबू गंगावणे (रा.शहा ता.इंदापूर) यांच्या अंगावर बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाली. त्यांना पुढील उपचारासाठी इंदापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले.

तर शर्यतीसाठी घाटाची निर्मिती उजनी धरण पात्राच्या किनाऱ्यावर करण्यात आल्याने शर्यती दरम्यान एक गाडा थेट नदीच्या पात्रात घुसल्याने आयोजकांसह प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. दोन बैलांचा जीव जाता जाता थोडक्यात वाचला. त्यानंतर परत एक प्रेक्षक घाटाच्या मध्येच गेल्याने तोही जखमी झाल्याचे समजत आहे.यामुळे योग्य ती काळजी न घेता अशा स्पर्धां आयोजनाबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

SCROLL FOR NEXT