Pune House Lifting 
पुणे

पुण्यात 'जॅक' लावून आख्खा बंगलाच उचलला..!

अश्‍विनी जाधव केदारी

पुणे : वाहनांच्या दुरुस्तीसाठी 'जॅक' लावल्याचे चित्र आपण नेहमी बघतो; मात्र 2000 स्केअर फूटच्या बंगल्याला तब्बल 250 जॅक लावून बंगल्याची उंची चार फूट वाढविण्यात आली आहे.

शहरातील बी. टी. कवडे रस्ता येथील तारदत्त कॉलनी या ठिकाणी असणाऱ्या 'भारद्वाज' नावाच्या बंगल्याची उंची चार फुटाने वाढवली आहे,. एरवी आपली कार पंक्चर झाली तर तिला जॅक लावून उचलेले आपण अनेकदा बघितलेले आहे. मात्र तशाच पद्धतीने कुणी बंगला उचलला तर निश्चितच आश्चर्य वाटते. असाच अनुभव परिसरातील नागरिक सध्या घेताहेत. इथला अख्खा बंगला पायाला शेकडो जॅक लावून उचलला आहे.

त्याचं झालं असं.. हा बंगला अनेक वर्षांपूर्वी बांधलेला होता. परिसरात विकासकामे झाली, तशी इथल्या रस्त्यांची उंचीही वाढली. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात येत होते. तब्बल दीड फूट पाणी घरात शिरल्याने बंगला मालक वैतागले. शेवटी ऑनलाईन सर्च करत असताना त्यांनी 'हाऊस लिफ्टिंग' या पर्यायाबद्दल वाचले आणि हरियाणाच्या एका ठेकेदाराला हे काम करावयास दिले. पुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून त्याचा नैसर्गिक आपत्तीच्या कारणाशिवाय कोणताही धोका नाही, असा दावा ठेकेदाराने केला आहे.

सुमारे 2000 स्क्वेअर फुटांच्या बंगल्याचा पाया कापून शेकडो जॅक लावून तो उचलला आणि मध्ये झालेल्या जागेत नव्याने विटा रचून त्याची उंची वाढवली. पुण्यात बहुधा  हा पहिला प्रयोग असल्याचा या टीमचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक उपोषण सोडणार की सुरूच ठेवणार? CJP आंदोलनादरम्यान मोठी घोषणा; पोस्ट लिहित भूमिका स्पष्ट

Pune Protest NEET Paper : ‘नीट’ पेपरफुटीवरून पुण्यात संतापाचा भडका; केंद्रीय शिक्षणमंत्री, पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

Mumbai Local Journey : मुंबई लोकलमध्ये मृत्यूशी इंचभराचं अंतर! दिवा-मुंब्रा दरम्यान महिलेचा थरार, लोकल प्रवास पुन्हा चर्चेत

Extortion Demand : कंत्राट टिकवण्यासाठी केटरर्सकडे खंडणीची मागणी; पुणे पोस्ट अँण्ड टेलिकॉम सोसायटीच्या संचालकांवर गुन्हा

Hospital Rules: रुग्णालयांत नवे नियम लागू! पान-गुटखा सेवन करणाऱ्यांना प्रवेशबंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय, आता तंबाखू खाऊन गेलात तर...

SCROLL FOR NEXT