Pune Crime police Investigation  sakal
पुणे

Pune: खराडी, पाषाण परिसरात घरफोडी, चार लाखांचा ऐवज चोरी

चंदननगर आणि चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.

सकाळ डिजिटल टीम

पुणे - खराडी आणि पाषाण परिसरात झालेल्या दोन घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरी केला. चंदननगर आणि चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.

याबाबत रणजित देवीसिंग ठाकूर (रा. थिटे वस्ती, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराचा सेफ्टी आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून ९८ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि ५२ हजारांची रोकड असा तीन लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

ही घटना २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर पाषाण गाव येथील बाळू शंकर शेळके यांच्या घरातून चोरट्यांनी ७० हजारांची रोकड चोरून नेली.

ही घटना २० ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. याबाबत चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT