indapur  sakal
पुणे

Pune : ‘तोडफोड’ऐवजी ‘रास्ता रोको’ आंदोलन

सरडेवाडी टोल नाका : तहसीलदार व पोलिसांच्या मध्यस्थीने मागण्या मान्य

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : तालुक्यातील सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या टोल प्रशासनाकडून स्थानिक युवकांच्या व्यवसायाला अडचणी निर्माण केल्या जातात. तसेच, स्थानिक वाहनांकडून अन्यायकारक टोल वसुली केली जाते. या विरोधात पुकारलेल्या ‘तोडफोड’ आंदोलनामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने काहीकाळ ‘रास्ता रोको’ करण्यात आले. त्यानंतर मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोल नाका येथील असुविधा, तसेच स्थानिक वाहनांकडून होणारी अन्यायकारक टोल वसुली याच्या विरोधात उजनी मत्स्यमार व्यावसायिकांची सामाजिक विकास संस्थाचे संस्थापक अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत टोलनाका तोडफोड आंदोलन करण्यात येणार होते.

त्यामध्ये सरडेवाडी टोल नाका प्रशासन स्थानिक युवकांच्या व्यवसायावर अन्याय करत आहे. तसेच, स्थानिक वाहनांची आर्थिक पिळवणूक करत आहे. टोलमध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्याऐवजी बाहेरच्या कामगारांना कामावर घेतले जात आहे. २० किलोमीटरमधील सर्व वाहनांना मोफत पास मिळाले पाहिजेत. महामार्गावरील सर्व कॅमेरे टोल प्रशासनाने तत्काळ सुरू करावेत. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. ते दुरुस्त करावेत. टोल हद्दीमध्ये सेवा रस्त्यावर अतिक्रमण असताना त्यांना अभय दिले जाते आणि स्थानिक युवकांनी चहाच्या टपऱ्या सुरू केल्या आहेत, त्यांना मात्र हुसकावून लावले जात आहे, असे विषय घेऊन टोलच्या विरोधात तोडफोड आंदोलन गुरुवारी (ता. २७) होणार होते.

यानुरुप उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, टोल प्रशासन अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये बैठका झाल्या. यावेळी स्थानिक वाहनधरकांचा प्रश्न वगळता सर्व मागण्या मान्य केल्या, मात्र स्थानिक वाहनधरकांच्या प्रश्नावर आंदोलन चिघळण्याची शक्यता होती. यावेळी महामार्गावर ‘रास्ता रोको’ सुरू केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अखेर याबाबत टोल प्रशासनाचे अधिकारी वरिष्ठांची चर्चा करून लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती तहसीलदारांनी दिली. तर, सोनवणे यांनी स्थानिकांनी आधारकार्ड दाखवून सवलत घ्यावी, असे ठरल्याचे सांगत आंदोलन मागे घेतले. या वेळेत जवळपास १ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलिस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे यांच्यासह पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली २१ अधिकारी व ८० पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे टोल नाक्याला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: एसी लोकलची संख्या वाढणार, १२० एसी लोकल रुळांवर धावणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; पाहा वेळापत्रक

गुलाबी साडी ते बॉलिवूड! संजू राठोडच्या गाण्याने पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं, Viral Video

Jyoti Waghmare: उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे...वरातीमागून घोडे! संजय राऊत दुतोंडी गांडूळ; खासदार ज्योती वाघमारे यांनी केली टीका

Latest Marathi News Update : नसरापूर प्रकरणात उद्या शिक्षेचा निकाल; दोषी भीमराव कांबळे याला फाशी की जन्मठेप?

Mumbai Local: धक्का लागला, माफी मागितली... तरी आरोपीने केला पाठलाग आणि चाकू हल्ला; मुंबई लोकलनंतर पुन्हा थरार

SCROLL FOR NEXT