Crime SAKAL
पुणे

पुणे : उद्योजक गायकवाड पिता-पुत्राला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बाप-लेकासह आईलाही करण्यात आली अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून सुनेचा छळ करण्याबरोबरच तिच्यावर अघोरी विद्येचा प्रयोग केल्याप्रकरणी औंध येथील गायकवाड कुटुंबातील तिघांना न्यायालयाने २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कुटुंबावर खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला.

या प्रकरणात नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा. एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोक्कानुसार दोनदा कारवार्इ झालेले गायकवाड बाप-लेक फरार झाले होते. पुणे पोलिसांनी त्यांना बुधवारी (ता. १९) कर्नाटक येथून अटक केली. त्यानंतर बाप-लेकासह नंदा यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली होती.

आरोपींकडून तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला आहे. आरोपींनी धमकावून काही जमिनींचा ताबा घेतला आहे, असे ॲड. कावेडिया यांनी न्यायालयास सांगितले. तर गायकवाड यांच्यावर राजकीय वैमनस्यातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या सुनेचे सासरच्यांबरोबर पटत नव्हते. त्यामुळे तिच्या परिवाराने हे गुन्हे दाखल करण्यासाठी यंत्रणेवर दबाव टाकला आहे, असा युक्तिवाद गायकवाड यांच्यावतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी केला. या प्रकरणातील मुळ फिर्यादीतर्फे ॲड. पुष्कर दुर्गे यांनी कामकाज पाहिलं.

दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा; ८५०० कोटींची देणार भेट, यंत्रणा तैनात पण अधिकृत घोषणा नाही

Mumbai: ७५ प्रवासी असणाऱ्या विमानाचं चाक हवेतच निखळलं अन्...; मुंबई विमानतळावर धक्कादायक घटना

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

दुर्दैवी ! बिल्डिंगवरून पडल्याने 37 वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव

Latest Marathi News Updates Live : सर आम्हाला सोडून जाऊ नका, विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा

SCROLL FOR NEXT