Pune businessman was abducted and shot dead in Satara For 2 crore 
पुणे

पुण्यातील व्यवसायिकाचे 2 कोटीसाठी अपहरण; साताऱ्यात गोळी घालून खून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या एका नामांकीत शुज शोरुमच्या मालकाचे दोन कोटी रुपयांसाठी अपहरण करुन त्याचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्यांनी व्यावसायिकास साताऱ्यातील लोणंद येथे पिस्तुलातून गोळी घालून खुन केल्याची घटना घडली. 

चंदन कृपादास शेवानी (वय 48, रा. बंडगार्डन) असे खुन झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यावसाय आहे. लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. मेवानी शनिवारी दिवसभर घरी होते. त्यानंतर ते रात्री घराबाहेर पडले. रात्री साडे दहा वाजल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता. 

दरम्यान, रविवारी दुपारी बारा वाजता सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्‍यात असणाऱ्या पाडेगाव येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. त्याबाबतची माहिती लोणंद पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी अनोळखी व्यक्तीच्या डोक्‍यात गोळी झाडून व अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर सातारा पोलिसांनी पुण्यासह अन्य शहरातील पोलिसांशी संपर्क साधून हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेतली. त्यावेळी संबंधीत मृतदेह हा बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या शेवानी यांचा असल्याची माहिती मिळाली. 
 

मुलगाच ठरला आईसाठी वैरी; अखेर त्या माऊलीने संपविले...

"भाईच्या सांगण्यावरुन केला खुन' 
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेवानी यांनी दोन कोटी रुपये दिले नाहीत. त्यामुळे भाईच्या सांगण्यावरुन त्यांचा खुन करण्यात आला असल्याचा उल्लेख आहे. 

पुणे :..अन् रिक्षाचालकाने अनुभवले वर्दीतील 'देवदूत'

"लक्ष्मी रस्त्यावरील एका नामांकीत शुज शोरुमच्या मालकाचे अपरहण करुन खुन केला आहे. त्याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.''
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधिक्षक, सातारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

Kolhapur Bullock Cart Race : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार! 82 गाड्यांचा सहभाग; कोल्हापूरच्या 'सतेज-ऋतू' शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर? वाचा विजेत्यांची यादी

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

2G Ethanol Uses : शेतीतील कचऱ्यापासून तयार होणार नवे इंधन! 2G इथेनॉलमुळे शेतकऱ्यांसह कोणकोणत्या क्षेत्राला फायदा?

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

SCROLL FOR NEXT