pune sakal
पुणे

Pune : ‘सीएए’मुळेच अल्पसंख्याकांना नागरिकत्व

चंद्रकांत पाटील यांची माहिती; विरोधकांवर टीका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘केंद्र सरकारने ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ (सीएए) आणल्यानंतर विरोधी पक्षाने त्यावर जोरदार टीका केली. मात्र अफगाणिस्तानातील घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, याचे महत्त्व आता स्पष्ट झाले आहे. या कायद्यामुळे अफगाणिस्तानातील हिंदू नागरिकांना भारतात आणताना फारशा अडचणी आल्या नाहीत,’ अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मोदी सरकारने सीएए कायद्याच्या माध्यमातून बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या सहा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिनिधी म्हणून प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा पुणे शहरातील या अल्पसंख्याक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. आमदार सुनील कांबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे कार्यवाह महेश करपे, सरचिटणीस राजेश पांडे, इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, शीख वर्ल्ड इंडियाचे अध्यक्ष अजितसिंह राजपाल, गुरुनानक दरबार कॅम्पचे अध्यक्ष संतसिंह मोखा, दिलीप मेहता, चरणजित सिंग, गुरुवार पेठ बौद्ध विहाराचे राजाभाऊ भोसले, वाल्मिकी तसेच इतर समजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘भाजपने कधीही कोणत्याही धर्मामध्ये फरक केलेला नाही. असे असतानाही नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणल्यानंतर मुस्लिम समाजाला दूर करण्यासाठी हा कायदा आणल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. हा कायदा किती महत्वाचा होता, याची जाणीव आता त्यांना झाली आहे. या तीन देशात राहणाऱ्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला तर विरोधकांच्या पोटात दुखायचे कारण काय. अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या पाठीशी भाजप कायमस्वरूपी राहणार आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप शहर उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT