पुण्यात कॅबचालकांचा संप अखेर मागे  Sakal
पुणे

Cab Driver Protest : पुण्यात कॅबचालकांचा संप अखेर मागे

कॅब भाडेवाढीबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची (आरटीए) बैठक येत्या सोमवारी (ता. ११) सायंकाळी ४. ३० वाजता होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कॅब भाडेवाढीबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची (आरटीए) बैठक येत्या सोमवारी (ता. ११) सायंकाळी ४. ३० वाजता होणार आहे. त्यामुळे शहरातील विविध कॅब संघटनांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला संप बुधवारी मागे घेण्यात आला आहे. तसेच शहरातील कॅब वाहतूक सायंकाळनंतर सुरळीत झाली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मीटर टॅक्सीसाठी जो दर निश्चित केला आहे, त्याच दराने कॅब कंपन्यांनी वाहतूक करावी, अशी मागणी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने केली आहे. मात्र, कॅब कंपन्यांनी भाडेवाढ करण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे ‘आरटीओ’ने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाहतूक संघटनांनी केली आहे. त्यानुसार ‘आरटीओ’ने नोटीस पाठवून कॅब कंपन्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कॅब कंपन्यांनी दरवाढ केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर ‘आरटीए’ची बैठक सोमवारी (ता. ११) घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी घेतला. त्या बैठकीत दरवाढीबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे कॅबचालकांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले आहे.

मात्र, प्रश्न सुटला नाही तर, सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, ‘‘‘आरटीए’च्या बैठकीत कॅबची दरवाढ आणि त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. तो पर्यंत सर्वांनी सामंजस्याने वागावे,’’ असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT