Pune Cab sakal
पुणे

Pune Cab : कॅबचालकांनी पावसात ‘हात घेतले धुवून’,जादा दराची आकारणी; बुकिंग रद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप

पावसाने पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडकरांची दाणादाण उडाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले. यातच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना कॅब चालकांच्या सरचार्जने चांगलेच ‘धुतले’.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पावसाने पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडकरांची दाणादाण उडाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले. यातच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना कॅब चालकांच्या सरचार्जने चांगलेच ‘धुतले’. नेहमीच्या दरापेक्षा जास्तीचे दर आकारल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसला. काही भागांत येण्यासाठी कॅबचालकांनी नकार दिल्याने प्रवाशांना रिक्षा व ‘पीएमपी’च्या बसवर अवलंबून राहावे लागले.

शहरातील सिंहगड रस्ता, नदीपात्र, धायरी, कल्याणी नगर, डेक्कन आदी भागांत मोठ्या प्रमाणांत पाणी साचले. त्यामुळे त्या भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. शहरात कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने अनेकांनी कॅबचा पर्याय निवडला. मात्र अनेकांना कॅबचे बुकिंगदेखील उपलब्ध होत नव्हते. कॅबच्या वेटिंगसाठी किमान २० ते २५ मिनिटांचा वेळ लागत होता. तर काही कॅबचालकांनी आधी बुकिंग घेऊन नंतर ते बुकिंग रद्द केले. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रिक्षाचालकांनी ५० रुपये तर कॅबचालकांनी ८० ते १०० रुपयांपर्यंत जास्तीचे दर आकारल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसला.

बुकिंग नाकारण्याचे प्रकार अधिक

कॅबचालकांनी सुरवातीला बुकिंग घेण्यास टाळाटाळ केली. ज्यांनी बुकिंग घेतले ते प्रवासी येताच उडवाउडवीची उत्तरे देऊन बुकिंग रद्द करण्याचा प्रयत्न करीत होते. प्रवाशांना गरज असल्याने त्यांनी ठरलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम देऊ केल्यास येण्याचे मान्य केले असल्याचा अनुभव अनेक प्रवाशांना आला. कॅब चालकांच्या या मुजोरीचा फटका प्रवाशांना बसला.

मी सिंहगड रस्ता परिसरात राहते. मला माझ्या नातलगांकडे कोथरूड येथे जायचे होते. दुपारी १२ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मी कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र बुकिंग झालेच नाही. काही वेळा बुकिंग झाल्यावर चालकांकडून ते रद्द होत होते.

- प्रियांका जोशी, प्रवासी

मी कात्रज येथील भारती विद्यापीठपासून बावधनला जाण्यासाठी कॅब बुक केली. बुक करताना बावधन येथील पत्ता व्यवस्थित दिला होता. मात्र कॅब चालकांनी सुरुवातीला हुज्जत घातली. नंतर येण्यास नकार दिला. मला जाणे आवश्यक असल्याने मी चालकाला जास्तीचे पैसे देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर तो येण्यास तयार झाला. प्रवाशांची ही एक प्रकारची लूट आहे.

- निशिगंधा चोळके, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! झिम्बाब्वेत सूर गवसला... ४ चौकार, ४ षटकारांसह अर्धशतक ठोकून गाजवले मैदान

Latest Marathi Update : ते घाबरले आहेत, म्हणूनच त्यांनी बॅरिकेड्स लावले - राजीव शुक्ला

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

Mumbai Rain: राज्यात पावसाचा कमबॅक! ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, पालघरसह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Guru Purnima 2026: 28 की 29 जुलै? यंदा गुरुपौर्णिमा नेमकी कधी? उदयतिथीनुसार जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT