Pune Cab News sakal
पुणे

Pune Cab News : दुसऱ्या दिवशीही कॅब सेवा विस्कळित

भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी शहरातील कॅबचालकांनी सुरू केलेल्या वाहतूक बंद आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसत असल्याचे बुधवारीही (ता. ६) दिसून आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी शहरातील कॅबचालकांनी सुरू केलेल्या वाहतूक बंद आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसत असल्याचे बुधवारीही (ता. ६) दिसून आले.

ओला, उबरने दरवाढ करावी, या मागणीसाठी ‘बघतोय रिक्षावाला’ आणि ‘मोटार, टॅक्सी ट्रान्स्पोर्ट असोसिएशन’ संघटनांनी कॅबचालकांना संप करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शहरातील कॅब वाहतूक गेल्या दोन दिवसांपासून विस्कळित झाली आहे.

त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. विमानतळ, पुणे रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय आणि खासगी कार्यालये येथील प्रवाशांची गैरसोय झाल्याचे बुधवारी दिसून आले.

दरम्यान, कॅबच्या दरात वाढ करणार नसल्याचे उबरने स्पष्ट केले आहे. दरवाढ केल्यास प्रवाशांना ६० टक्के अधिक भुर्दंड पडेल, असे उबरचे म्हणणे आहे. या बाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT