Firing news in pune Sakal
पुणे

पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट भागात गोळीबार

पूर्व वैमनस्यातून छर्‍याच्या बंदुकीतून गोळी झाडल्याची पोलिसांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील गजबजलेल्या भागात गोळीबार केल्याची घटना घडली आहे. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट या भागात एका तरूणाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात एक तरूण किरकोळ जखमी झाला आहे.

(Pune Fashion Street Firing)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने दुसऱ्यावर पूर्व वैमनस्यातून छर्‍याच्या बंदुकीतून गोळी झाडली आहे. हे दोघेही एकमेकांना ओळखतात पण पूर्वीच्या वादाचा बदला म्हणून हा गोळीबार करण्यात आल्याचं सांगितलं आहे. दरम्यान जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तौफिक अख्तर शेख (वय ४५, रा. भीमपुरा, लष्कर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुल्फीफार शेख नावाच्या व्यक्ती विरुद्ध रात्री उशिरा लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक शेख व जुल्फीकार शेख यांचे फॅशन स्ट्रीट परिसरात व्यवसाय आहेत. मागील काही महिन्यांपासून तौफिक व जुल्फीकार यांच्यात वाद सुरू आहेत. मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास तौफिक फॅशन स्ट्रीट परिसरातील एका दुकानाजवळ थांबले हाेते. त्या वेळी जुल्फीकार तेथे आला आणि त्याने त्याच्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून तोफिकवर गोळीबार केला.

गोळीबाराच्या या घटनेनंतर फॅशन स्ट्रीट परिसरातील नागरीक व व्यावसायिक यांच्यात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. तेव्हा जुल्फिकारने गोळीबार केल्याची माहिती मिळाली. जुल्फीकारला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावचे गजानन महाराज संस्थान, १ कोटी ११ लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीत

Asian Games 2026 : नवी मुंबईच्या Harita Bhadra ने ०.०१ सेकंदाच्या फरकाने जिंकले पदक; आहे भारताची दुसरी सर्वात वेगवान धावपटू

Election Commission controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाण यांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी

चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT