पुणे

वेशभूषा बदलून फिरणारा गांजा तस्कर अटकेत

CD

पुणे, ता. ८ : गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांना गेले चार महिने गुंगारा देणाऱ्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.
अजय पोपटराव पाडुळे (वय ३०, रा. नवीन म्हाडा वसाहत, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पाडुळे आणि त्याचा साथीदार चारुदत्त चव्हाण यांच्यावर गांजा तस्करी प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. चव्हाण याच्याकडून ३५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाडुळे पसार झाला. तपासात पाडुळे हा शहरात गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पाडुळे याने वेशभूषा बदलली होती, तसेच तो समाजमाध्यमांचा वापर करत नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण आली होती. पाडुळे हा म्हाडा वसाहतीत आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार आणि संदीप आगळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. पाडुळे याच्यावर भारती विद्यापीठ, लोणी काळभोर, वानवडी पोलिस ठाण्यांत अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले असून, तो या गुन्ह्यांत पसार आहे.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT