cantonment board smart bus stand sakal
पुणे

Pune Cantonment Board : पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये आज रात्री बारानंतर टोल वसुली बंद, नागरिकांकडून स्वागत

पुणे कॅन्टोन्मेंट विभागातील (वेहिकल एन्ट्री टॅक्स) वाहन प्रवेश कर हे प्रमुख महसुलाचे साधन होते. कॅन्टोन्मेंटच्या चारही बाजूला 13 ठिकाणी असलेल्या वसुली केंद्रामार्फत बोर्डाला दरवर्षी 13 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता.

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट - पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत प्रवेश करण्यासाठी वाहन टॅक्सची वसुली बंद करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून अखेर बोर्डाला गॅझेटच्या स्वरूपात आदेश देण्यात आले आहे. दि १३ एप्रिल (मंगळवार) रोजी रात्री १२ वा. नंतर वसुली बंद करण्याचे आदेश बोर्डाकडून वसुली केंद्राला देण्यात आले आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विभागातील (वेहिकल एन्ट्री टॅक्स) वाहन प्रवेश कर हे प्रमुख महसुलाचे साधन होते. कॅन्टोन्मेंटच्या चारही बाजूला 13 ठिकाणी असलेल्या वसुली केंद्रामार्फत बोर्डाला दरवर्षी 13 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता.

केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार हे साधन बंद झाल्याने बोर्डाच्या उत्पन्नात घट जरी झालेली असली तरी, मात्र यानिर्णयाचे स्वागत नागरिकांनी केले आहे.

बोर्डाची आर्थिक परिस्थिती एकीकडे ढासळली असताना जीएसटी चा वाटा मिळण्यासाठी बोर्ड अनेक वर्षापासून प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे उत्पन्नाचे साधन कमी झाल्याने बोर्डाची अवस्था अधिक बिकट झालेली आहे.

बोर्डातील महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात बोर्डातील सीईओ सुब्रत पाल यांच्याशी कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता परंतु तो होऊ शकला नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT