ajit pawar esakal
पुणे

Ajit Pawar : ''चॅलेंज स्वीकारते पण नार्को टेस्टचे प्रश्न...'', अंजली दमानियांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

''अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फोन केला नाही.. तर जसे अजित पवार म्हणाले, की “मी गप्प घरी बसावं आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा” हे मला पूर्णपणे मान्य.''

संतोष कानडे

Anjali Damania : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अजित पवारांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केला होता, असा दावा करुन अंजली दमानिया यांनी खळबळ उडवून दिली होती. अजित पवारांनी हे दावे फेटाळून लावले होते. शिवाय मी नार्को टेस्टला तयार आहे, पण त्यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा, असं आव्हान अजित पवार बुधवारी दिलं होतं.

त्यानंतर अंजली दमानियांनी 'एक्स'वर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारुन अजित पवारांनी नार्को स्टेट करावी पण प्रश्न माझे असतील, असं म्हटलंय.

अंजली दमानिया म्हणाल्या की, मी तुमचं चॅलेंज स्वीकारते, पण प्लीज तुमची नार्को टेस्ट करा. विशाल अग्रवाल आणि तुमचा काहीही संबंध नाही, या प्रकरणात तुम्ही काही केलं नाही.. हे जर सिद्ध झालं तर मी या विषयावर वाच्यतादेखील करणार नाही. मात्र नार्को टेस्टसाठी प्रश्नावली मी लिहून देणार, असं दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानिया यांची पोस्ट

चैलेंज मंजुर आहे ।

अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फोन केला नाही.. तर जसे अजित पवार म्हणाले, की “मी गप्प घरी बसावं आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा” हे मला पूर्णपणे मान्य. कधी करणार नर्को टेस्ट करणार ते लवकरात लवकर कळवा... अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

नार्को टेस्टवर बोलताना अजित पवार म्हणाले, "माझी नार्को टेस्टची तयारी आहे. पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिने (अंजली दमानियांनी) पुन्हा कुठे पुढे यायचं नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा", अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT