Car got Fired 
पुणे

Pune Accident: आगाखान पॅलेससमोर कारची डंपरला जोरदार धडक; क्षणात घेतला पेट!

अग्निशमन दलाच्या जवानानं करमध्ये अडकून पडलेल्या चालक महिलेला सुरक्षितरित्या बाहेर काढलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : नगर-पुणे रस्त्यावर एक भीषण अपघात सकाळी घडला. यामध्ये रस्त्यात उभ्या असलेल्या एका डंपरला कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कारनं पेट घेतला, यावेळी कारचालक महिला कारमध्ये अडकून पडली होती. पण अग्निशमन दलाच्या जवानानं तीला सुरक्षितरित्या बाहेर काढलं. (Pune Car accident in front of Aga khan Palace got caught fire)

सुत्रांच्या माहितीनुसार, नगर-पुणे महामार्गावरील आगाखान पॅलेस समोर उभ्या असलेल्या डंपरला मागून कारची धडक दिली आणि कारनं पेट घेतला. फोर्ड इकोस्पोर्ट या कारनं मागच्या बाजूनं डंपरला धडक दिली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एका प्रशिक्षित फायरमन जवानानं आपल्या हेल्मेटनं गाडीची काच फोडली आणि कारचालक महिलेला सुरक्षितरित्या बाहेर काढलं. नविता (वय 35, रा. वडगाव शेरी) असं या कारचालक महिलेचं नाव आहे.

या घटनेनंतर समोरच असलेल्या शांतीवन सॉफ्टवेअर हब कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीची अग्निशमन यंत्रणा वापरून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलानं पोहोचून आग पूर्णपणे विझवली. कार्यप्रभारी अधिकारी सोपान पवार, ड्रायव्हर सचिन वाघमारे, फायरमन सचिन जौजळे, संजय कारले मदतनीस राहुल वडेकर, शरद दराडे आणि अक्षय केदारी यांनी या दुर्घटनेत आग विझवण्याचं आणि मदतीच काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT