Pune Car tire burst highway Vadgaon Budruk flyover incident Warje queues vehicles towards Dukkar Khindi Sakal
पुणे

Pune Traffic : महामार्गावर मोटारीचा टायर फुटला; वारजे, डुक्कर खिंडीच्या दिशेने वाहनांच्या रांगा

महामार्गाच्या वडगाव बुद्रुक उड्डाणपुलावर एका मोटारीचा टायर फुटल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - पश्चिम बाह्यवळण महामार्गावर वारजे- वडगाव दरम्यान सातारा बाजूला जाणाऱ्या मार्गावर मोटारीचा टायर फुटल्याने एक लेन बंद झाली आहे. यामुळे वारजे, डुक्कर खिंडीच्या दिशेने वाहनांच्या रांगा शनिवारी सकाळी सकाळी पहावयास मिळाल्या.

दरम्यान, चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काही तासावर असताना वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे, वाहतूक पोलीसांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी गडबड उडालेली दिसून आली.

महामार्गाच्या वडगाव बुद्रुक उड्डाणपुलावर एका मोटारीचा टायर फुटल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. याबाबत वडगाव बुद्रुक वाहतूक पोलिसांना याची माहिती देण्यात आल्याचे वारजे वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांनी सांगितले.

शनिवारी सकाळी सात वाजल्यानंतर ही घटना घडली असावी. त्यानंतर, साडेसात वाजता मागे वारजे, डुक्कर खिंडीच्या दिशेने महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या. परिणामी डुक्कर खिंडीत महामार्गावरील वाहने सेवा रस्त्याला येऊ लागली. या घटनेनंतर सकाळी नऊ वाजता वारजे परिसरात सातारा बाजूला जाण्याच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT