Pune Crime News Sakal
पुणे

Pune Crime: शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी वीज कर्मचाऱ्यांवर गुन्हा

या प्रकरणी भापकर व माने या दोन महावितरण कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.

सकाळ वृत्तसेवा

शिर्सुफळ- उंडवडी कडेपठार गावातील माकरवस्तीवरील विजेच्या खांबावर शेतकऱ्याला चढायला लावून त्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महावितरण कंपनीच्या संदीप भापकर व सचिन माने या दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उंडवडी सुपे येथील रहिवासी असलेले विजय मुरलीधर गवळी (वय ५४) या शेतकऱ्याचा मंगळवारी (ता. ४) अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थ व कुटुंबीयांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.

या प्रकरणी भापकर व माने या दोन महावितरण कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात विजय यांचे बंधू पोपट मुरलीधर गवळी यांनी फिर्याद दिली. विजय यांनी यापूर्वी वीजेचे खांब उभे करण्याचे काम केलेले असल्याने खांबावर चढून इलेक्ट्रीक कामे करणे त्यांना शक्य होत असे.

या भागात विजेची काही समस्या निर्माण झाल्यास महावितरणचे कर्मचारी त्यांना कामासाठी बोलवत असे. ४ एप्रिल रोजी फिर्यादीने भावाला कारखेलला जाऊन तलाठी कार्यालयातील काम करून ये, असे सांगितले. (Latest Marathi News)

परंतु, महावितरण कर्मचारी यांचा फोन आल्याने मी तिकडे वीजेचे काम करायला जात असल्याचे विजय यांनी सांगितले. ते विजेच्या खांबावर काम करत असताना त्यांना वीजेचा धक्का बसल्यामुळे खांबावरून खाली पडल्याने त्यांना जोराचा मार लागला. त्यांना उपचारासाठी बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विजेच्या खांबावरील तारांचे काम करण्यासाठी त्यांना सांगितले असतानाच अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने हा प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT