crime news
crime news sakal
पुणे

महिलेला पोलिस चौकीत जबर मारहाण करणाऱ्या पोलिसाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

महिलेस पोलिस चौकीत बोलावून जबर मारहाण करणाऱ्या पोलिसावर 15 दिवसानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे - रस्त्यात अडथळ होत असलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेस पोलिस चौकीत बोलावून जबर मारहाण करणाऱ्या पोलिसावर 15 दिवसानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिल्या होत्या.

राहुल शिंगे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी ५० वर्षीय व्यापारी महिलेने विश्राम बाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिंगे याने महिलेस मारहाण करण्याची घटना 19 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले मंडई पोलिस चौकीत घडली होती. फिर्यादी महिलेचे महात्मा फुले मंडई पोलिस चौकी शेजारी दुकान आहे. तर शिंगे हा खडक पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

19 ऑक्टोबर रोजी साध्या वेषातील शिंगे हा त्याच्या साथीदारासह मंडई चौकीजवळ आला. त्याने त्याची दुचाकी फिर्यादीच्या दुकानासमोरील रस्त्यावर उभी केल्याने महिलेने त्यास दुचाकी बाजूला घेण्यास सांगितली, त्याने त्यांच्याशी हुज्जत घालत, त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर शिंगे याने महिलेस साहेबांनी बोलावले असल्याचे सांगत पोलिस चौकीत बोलावून महिलेस मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा डोळा सुजला असून चेहरा आणि डोक्याला जबर मार लागला होता. मारहाणीमुळे महिला बेशुद्ध झाल्या होत्या.

पालकमंत्री पाटील यांच्या पोलिस आयुक्तांना सूचना

पोलिस कर्मचाऱ्याने महिलेस पोलिस चौकीत मारहाण करण्याच्या घटनेनंतरही संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार घेण्यास हि विश्रामबाग पोलिसांनी टाळाटाळ केली. संबंधित प्रकरण पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलिस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे यांच्यापर्यंत गेले. अखेर 15 दिवसांनी शिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT