पुणे

चाकण वाहतूक कोंडीवर ‘एआय’चा उतारा

CD

पुणे, ता. २१ : चाकण औद्योगिक परिसरातील (एमआयडीसी) वाहतूक कोंडी कायमस्वरूपी फोडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित विश्लेषणाच्या आधारे सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले, तसेच परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवणे व प्राथमिक सुधारणांची कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.

चाकण परिसरातील वाहतूक नियोजन, वाहनतळ आणि रस्ते व्यवस्थापनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी परस्पर समन्वयाने निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.

महत्त्वाचे निर्णय आणि सूचना :
‘एआय’द्वारे अभ्यास : वाहतूक प्रवाह, वाहनांची संख्या व कोंडीची ठिकाणे यांचे ‘एआय’द्वारे आभासी मॉडेल तयार करून पुढील शुक्रवारपर्यंत आराखडा तयार करावा. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यता घेऊन तीन ते चार महिन्यांत कामे पूर्ण केली जातील.

अतिक्रमण निर्मूलन : वाहतूक कोंडी होणाऱ्या १९ किलोमीटरच्या पट्ट्यातील अतिक्रमणांचे संयुक्त पंचनामे करून नोटिसा बजावाव्यात. पुढील शुक्रवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करावी.

तातडीची रस्ते दुरुस्ती : खड्डे बुजवणे, साइड पट्टे-शोल्डर व्यवस्थित करणे, पावसाचा गाळ आणि साचलेला कचरा साफ करणे ही कामे ३१ ऑगस्टपर्यंत प्राधान्याने पूर्ण करावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: मोठी बातमी! इस्रो आता प्रक्षेपण यान बनवणार नाही, जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे; संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने; मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

SCROLL FOR NEXT